सध्या आयपीएल 2025 मेगा लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या दरम्यान आयपीएल 2025 ची सुरूवातीची तारीख समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील तीन सीझनच्या तारखा समोर आल्या आहेत. 2025 चा हंगाम 14 मार्च ते 25 मे या कालावधीत खेळवला जाईल. त्या पुढील हंगाम 15 मार्चला सुरू होईल आणि अंतिम सामना 31 मे रोजी होईल. याशिवाय, आयपीएल 2027 ची तारीख देखील समोर आली आहे. जी 14 मार्चपासून सुरू होईल आणि 30 मे पर्यंत चालेल.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, सर्व फ्रँचायझींना ई-मेलद्वारे पुढील तीन सीझनच्या सुरुवातीच्या तारखांची माहिती देण्यात आली. या तारखांना लवकरच अधिकृत पुष्टी दिली जाऊ शकते. गेल्या तीन मोसमाप्रमाणे आयपीएल 2025 च्या मोसमात एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे पुढील हंगामात सामन्यांची संख्या वाढवता येईल. आयपीएल 2026 मध्ये 84 सामने होतील आणि 2027 च्या हंगामात सामन्यांची संख्या 94 पर्यंत वाढवता येईल. सामन्यांच्या संख्येत वाढ होण्याचे कारण मीडिया अधिकार असू शकतात.
🚨 REPORTS 🚨
Dates for the next three IPL seasons have been revealed 🗓️
🔹 IPL 2025: March 14 to May 25
🔸 IPL 2026: March 15 to May 31
🔹 IPL 2027: March 14 to May 30Are you excited? 🤩#IPL #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/qVZGdpBTtn
— Sportskeeda (@Sportskeeda) November 22, 2024
आयपीएलच्या सर्व 10 फ्रँचायझींसाठी ही आनंदाची बातमी आहे की जवळजवळ सर्व पूर्ण आयसीसी सदस्य देशांनी त्यांच्या खेळाडूंना पुढील तीन हंगामांसाठी आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. 2025 च्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने एक नवीन नियम जारी केला होता. या अंतर्गत, जर कोणताही परदेशी खेळाडू मेगा लिलावाचा भाग झाला नाही. तर तो पुढील दोन हंगाम खेळू शकणार नाही. दुसरीकडे, लिलावात खरेदी केल्यानंतर परदेशी खेळाडूने आपले नाव मागे घेतल्यास त्याला दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागण्याची तरतूद आहे.
हेही वाचा-
अश्विन-जडेजाशिवाय भारत शेवटचा कधी खेळला? गेल्या 10 वर्षात 5व्यांदा असं घडलं
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियासाठी स्टार खेळाडूंचे पदार्पण, कोहली-अश्विनने दिली कॅप
IND VS AUS; टीम इंडियाचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय, या दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी