रणजी ट्रॉफी २०२१-२२चा मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) अंतिम सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे सुरू आहे. या सामन्याचा आज (२५ जून) चौथा दिवस आहे. मुंबईने नाणेफेक जिंकत पहिल्या डावात ३७४ धावा केल्या. यामध्ये सरफराज खान (Sarfaraz Khan) याने १३४ धावा केल्या. मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी देखील उत्तम खेळी करत मुंबईला अडचणीत आणले आहे. त्यांच्या तीन फलंदाजांनी शतके ठोकली आहेत. यामध्ये यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार (Rajat Patidar) यांचा समावेश आहे. हा सामना पाहण्यासाठी भारताचा स्टार खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचला आहे. त्यावेळी लोकांनी ‘सीएसके, सीएसके’ असा नारा दिला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि भारताचा गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तो सध्या बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये (एनसीए) रेहॅबिल्टेशनसाठी आला आहे. दुखापतीमुळे तो आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२ हंगामामधून बाहेर पडला होता. यावेळी त्याने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याला हजेरी लावली आहे. तो स्टेडियममध्ये येताच लोकांनी सीएसकेचा नारा दिला आहे.
https://twitter.com/cricketfanvideo/status/1540584579500613632?s=20&t=XiUw2vCYyic5WAFp39UYJQ
चाहर हा भारताच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने भारताकडून शेवटचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध फेब्रुवारी २०२२मध्ये खेळला होता. टी२० सामन्यांच्या या मालिकेत तो दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या जागी बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्शदीप सिंग आणि उमराम मलिक यांना संघात स्थान दिलेे होते. या दोघांचीही आयर्लंड दौऱ्यात संघात निवड करण्यात आली आहे.
रणजी ट्रॉफीच्या या अंतिम सामन्यात पाटीदारने शतक ठोकत या रणजी हंगामातील दुसरे शतक केले आहे. त्याने पाच अर्धशतकेही केली आहेत. मध्य प्रदेशने पहिल्या डावात सर्वबाद ५३६ धावा केल्या आहेत. यामुळे त्यांनी मुंबईवर १५० पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवली आहे. या डावात मुंबईचा यशस्वी गोलंदाज शम्स मुलाणी याने पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केली आहे. त्याने मध्य प्रदेशचा अर्धा संघ तंंबूत पाठवला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रवी शास्त्रींचा प्रशिक्षक लक्ष्मणला कामाचा सल्ला; म्हणाले, ‘त्याला’ तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, मग…
हे फक्त पंतच करू शकतो..! रिषभने स्वत:च्याच विकेटचे केले सेलिब्रेशन, जडेजाला मारली मिठी