दिल्ली । आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीची आज दिल्ली येथे बैठक झाली. यावेळी खेळाडूंच्या संघात ठेवण्याच्या निर्णयावर, मिळणाऱ्या पैशांवर आणि बाकी गोष्टींवर चर्चा झाली.
यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यातील ठळक निर्णय-
खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा नियम-
कोणताही संघ ५ खेळाडूंना कायम ठेवू शकतो. त्यासाठी लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ५ खेळाडू संघात कायम ठेवता येऊ शकतात.
यातील लिलावात राइट टू मॅच वापरून ३ खेळाडू कोणत्याही प्रकारात जास्तीत जास्त कायम ठेवता येऊ शकतात तर एकत्र त्याची बेरीज ५ असेल. लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ३ कॅपेड भारतीय खेळाडू किंवा जास्तीतजास्त २ परदेशी खेळाडू किंवा २ अनकॅपेड भारतीय खेळाडू संघात घेऊ शकतात.
चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून २०१५ आणि २०१६मध्ये गुजरात आणि पुण्याकडून खेळलेल्या खेळाडूंना कायम ठेवू शकतात.
खेळाडूंना संघात कायम ठेवताना जर ते तीन खेळाडू असतील तर त्यातील पहिल्या खेळाडूला १५ कोटी, दुसऱ्याला ११ कोटी आणि तिसऱ्याला ७ कोटी पेक्षा जास्त रुपये मोजता येणार नाहीत.
जर दोन खेळाडू कायम ठेवायचे असतील तर पहिल्या खेळाडूला १२.५ कोटी आणि दुसऱ्याला ८.५ कोटीपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही.
संघाला एकाच खेळाडूला जर कायम करायचे असेल तर १२.५ कोटी खर्च करता येतील.
एका संघात जास्तीतजास्त २५ खेळाडूंचा स्क्वाड असेल.
NEWS: IPL player policies declared for the upcoming seasonhttps://t.co/EhB2Ka9L7B pic.twitter.com/5Q4m0ntwHz
— IndianPremierLeague (@IPL) December 6, 2017