पुणे। चेन्नई सुपर किंग्जचे सध्या पुण्यात घरचे सामने होत आहेत. परंतू पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी एक अपेक्षाभंग करणार वृत्त आहे.
पुण्यात होणारे आयपीएल प्ले आॅफचे सामने लखनऊमध्ये हलवले जाण्याची शक्यता आहे. याआधीही हे सामने हलवण्याचे वृत्त होते. पण ठिकाण समजले नव्हते. अाता हे सामने लखनऊमध्ये होऊ शकतात.
पण अजुनही याबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही. लखनऊमधील स्टेडियमची चाचणी सुरू आहे. या चाचणीनंतर याबद्दल पुढचा निर्णय घेतला जाईल.
पुण्याचा संघ नसूनही पुण्याला साखळी फेरीचे सामने दिले असल्यामूळे हे प्ले आॅफचे सामने इतरत्र हलवले जाणार असल्याचे समजते.
याविषयी काही दिवसांपूर्वी अायपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले होते की “आम्ही पुण्यातील प्ले आॅफ आणि काॅलिफायरचे सामने अन्य शहरात हलवणार आहे. आम्ही याबद्दल एक दोन दिवसांत निर्णय घेऊ. ”
हे सामने पुणे शहरात २३ आणि २५ मे रोजी होणार होते.