दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात होणारी आयपीएल यावर्षी मात्र कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. अगदी आजही आयपीएल नक्की कधी होणार याबाबत चाहत्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे.
आयपीएल झालीच, तर कोणता संघ विजयी होणार याबाबद्दलदेखील चाहत्यांच्या मनात बरीच उत्सुकता असेल. सोशल मीडियावर तरी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचे चाहते आघाडी घेताना दिसत आहेत.
तरीही पुन्हा एकदा चाहत्यांच्या तोंडी केवळ दोनच संघांची नावे सर्वप्रथम येताना दिसतात. ती नावे इतर कोणत्या संघाची नसून मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या संघांची असणार. कारण मुंबई इंडियन्सने २००८मध्ये आयपीएलची सुरवात झाल्यापासून आतापर्यंत ४ वेळा विजेतेपद मिळविले आहेत, तर सीएसकेने आतापर्यंत ३वेळा म्हणजेच २०१०, २०११ आणि २०१८मध्ये आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहेत. त्यामध्ये सीएसकेच्या सर्व खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले आहे.
या लेखात आपण चेन्नई सुपर किंग्जकडून एका सामन्यात सर्वाधिक धावांची खेळी करणाऱ्या ३ दिग्गज फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत.
सीएसकेकडून एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारे ३ फलंदाज- IPL Records Chennai Super Kings 3 Batsman Most Runs In An Innings
३. मायकल हसी (नाबाद ११६ धावा)
सीएसकेचा माजी खेळाडू मायकल हसीच्या (Michael Hussey) नावावर आयपीएलमध्ये अनेक मोठ-मोठे विक्रम आहेत. असे असले तरीही त्याने अनेकवेळा आपल्या धडाकेबाज खेळीमुळे संघाला विजय मिळवून दिला आहे. इतकेच नव्हे तर सीएसकेकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये हसीचा तिसरा क्रमांक लागतो.
हसीने आयपीएलच्या सुरुवातीच्या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) नाबाद ११६ धावांची खेळी केली होती, ज्यामध्ये त्याने ५४ चेंडूंचा सामना कररताना ८ चौकार आणि ९ षटकार ठोकले होते. त्यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २१४.८१ इतका होता. त्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद २४० धावा केल्या होत्या, त्यानंतर सीएसकेच्या धावांचा सामना करताना पंजाब संघाला ४ बाद २०७ धावाच करता आल्या होत्या. अशाप्रकारे सीएसकेने तो सामना ३३ धावांनी जिंकला होता.
२. शेन वॉटसन (नाबाद ११७ धावा)
सीएसकेकडून सर्वाधिक खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज शेन वॉटसन (Shane Watson) आहे. त्याने २७ मे २०१८ला सनरायजर्स हैद्राबादविरुद्धच्या (Sunrisers Hyderabad) अंतिम सामन्यात ५७ चेंडूत नाबाद ११७ धावांची खेळी केली होती. त्यात वॉटसनने ११ चौकार आणि ८ षटकारही ठोकले होते.
त्या सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १७८ धावा केल्या होत्या. हैद्राबादने दिलेल्या १७९ धावांचे आव्हान वॉटसच्या चमकदार खेळीमुळे सीएसकेने केवळ १८.३ षटकात १८१ धावा करत पूर्ण करत तो सामना जिंकला होता.
१. मुरली विजय (१२७ धावा)
सीएसकेकडून सर्वाधिक धावांची खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर भारतीय संघाचा फलंदाज मुरली विजय (Murali Vijay) आहे. सीएसके संघात सामील झालेल्या विजयने २०१०च्या मोसमातच राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) तुफान खेळी केली होती, ज्यामध्ये त्याने ५६ चेंडूंमध्ये २२६.७८ च्या स्ट्राईक रेटने १२७ धावा केल्या होत्या. त्यात ८ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता.
त्या सामन्यात विजयच्या या खेळीच्या जोरावर सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद २४६ धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थानने सीएसकेच्या २४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ५ बाद २२३ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे सीएसकेने तो सामना २३ धावांनी जिंकला होता.
वाचनीय लेख-
-एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा
-विश्वचषक इतिहासातील ‘हे’ ५ अविस्मरणीय सामने, जे चाहत्यांनी विसरणे महाकठीण