---Advertisement---

“अगदी मनासारखे घडलेय”; रिटेन झाल्यावर आली ‘स्पीडस्टार’ उमरानची पहिली प्रतिक्रिया

On: शुक्रवार, डिसेंबर 3, 2021 2:05 AM
umran-malik
---Advertisement---

आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी प्रत्येक फ्रेंचायझीला प्रत्येकी चार खेळाडूंना संघात कायम ठेवता येणार (रिटेन) होते. सनरायझर्स हैदराबादने पुढच्या हंगामासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये जम्मू काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा समावेश आहे. अशात माहिती समोर येत आहे की, त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाने रिटेन केल्यामुळे तो खूप आनंदी आहे आणि ज्या संघाने त्याला पहिल्यांदा आयपीएल पदार्पण करण्याची संधी दिली, त्याच्यासोबतच त्याची खेळण्याची इच्छा होती.

उमरान सध्या भारत अ संघासोबत दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. तत्पूर्वी, यावर्षी पार पडलेल्या आयपीएल हंगामात त्याने सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. ज्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा झालेली. उमरान सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असल्यामुळे त्याचे वडील अब्दुल राशिद मलिक यांनी माध्यमांसोबत त्याला मिळालेल्या संधीविषयी चर्चा केली. अब्दुल यांनी गुरुवारी (२ डिसेंबर) फोनवरून उमरानसोबत चर्चा केली होती.

यावेळी त्यांनी सांगितले की, उमरान त्याला सनरायझर्स हैदराबादने रिटेन केल्यामुळे आनंदी आहे. उमरान त्याच्या वडिलांसोबत बोलताना म्हटला की, ज्या संघाने त्याला आयपीएलसारख्या मोठ्या स्टेजवर संधी दिली, त्या संघासोबतच तो पुढे खेळू इच्छित होता. त्याची इच्छा होती की, लिलावात देखील त्याला सनरायझर्स हैदराबाद संघानेच विकत घ्यावे. अशात हैदराबादने त्याला रिटेन करणे त्याच्या कारकिर्दीसाठी चांगले असणार आहे. त्याव्यतिरिक्त जम्मू कश्मीरचाच दुसरा खेळाडू अब्दुल समदला देखील पुढच्या हंगामासाठी हैदराबाद संघाने रिटेन केले आहे. याबाबत बोलताना उमरान म्हटला की, समद सोबत खेळल्यामुळे त्याला खूप काही शिकायला मिळेल. हे दोघेही एकत्र सराव करतात आणि त्यांचे एकमेकासोबत चांगले संबंध देखील आहेत. केन विलियम्सन सनरायझर्स हैदराबादने रिटेन केलेला तिसरा खेळाडू आहे.

दरम्यान, उमरान मलिकेच्या वडिलांचे जम्मूमधील शाहीदी चौकात फळविक्रिचे दुकान आहे. हे दुकान त्याचे वडील आणि चुलते सांभाळतात. उमराचे वडील पुढे बोलताना म्हणाले की, तो जेव्हापासून लहान होता, तेव्हापासूनच गल्लीतील इतर मुलांसोबत क्रिकेट खेळायचा. मी जेव्हाही त्याला काही बोलायचो, तर तो फक्त हेच म्हणायचा की, बाब मी क्रिकेटमध्ये तुमचे नाव मोठे करील. मी देशासाठी खेळेल. आज माझ्या मुलाने खरोखरच माझे नाव रोशन केले. आज त्याच्याविषयी प्रत्येकाला माहिती घ्यायची आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---