नवी दिल्ली। आयपीएलमध्ये केएल राहुलच्या नेतृत्वातील किंग्स इलेव्हन पंजाब संघ पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. गुरुवारी (१५ ऑक्टोबर) पंजाब संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झाला. या सामन्याच्या एक दिवसआधी राहुलने मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला होता की, बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि स्टार फलंदाज एबी डिविलियर्सला आयपीएलने बॅन केले पाहिजे.
राहुलला विराट आणि डिविलियर्सला करायचंय बॅन
खरंतर सामन्याच्या एक दिवसाआधी राहुल आणि विराट इंस्टाग्रामवर लाईव्ह आले होते. यावेळी दोघांनीही एकमेकांना अनेक प्रश्न विचारले आणि उत्तरेही दिली. यादरम्यान विराटने राहुलला प्रश्न विचारला की, जर त्याला संधी दिली की तो आयपीएल किंवा टी२० चा कोणताही एक नियम बदलू शकतो, तेव्हा तो नियम काय असेल?
यावर प्रत्युत्तर देत राहुलने म्हटले, “जर मला संधी दिली, तर माझी अशी इच्छा आहे की तुला आणि एबी डिविलियर्सला आयपीएलने बॅन केले पाहिजे. समजा तू ५००० धावा पूर्ण केल्या आहेत, तर या पुरेश्या आहेत. यानंतर तू इतर खेळाडूंना काम करण्याची संधी दिली पाहिजे.” राहुलचे हे वक्तव्य ऐकून विराट हसायला लागला.
खरं तर आयपीएल २०२० च्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये राहुल अव्वल क्रमांकावर आहे.
आयपीएलमध्ये विराट आणि डिविलियर्सची जोडी आहे हिट
विराट आणि डिविलियर्स आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी करणारे खेळाडू बनले आहेत. दोघांनीही सोबत खेळताना १० वेळा शतकी भागीदारी रचली आहे. याव्यतिरिक्त विराट आणि डिविलियर्सने एकत्र खेळताना आयपीएलमध्ये एकूण ३००० धावांची टप्पाही पार केला आहे.
यावर्षी आयपीएलच्या १३ व्या हंगामातही विराट आणि डिविलियर्सच्या जोडीने आपल्या संघाला ७ सामन्यांपैकी ५ सामन्यात विजय मिळवून दिले आहेत. ते पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत. दुसरीकडे राहुलच्या नेतृत्वातील पंजाब संघाने आतापर्यंत केवळ १ विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भल्या- भल्यांवर ठरली विराट- डिविलियर्सची जोडीच वरचढ, गाठला पहिला नंबर
-विराट-डिविलियर्सच्या जोडीला तोडंच नाही, ‘या’ जोड्यांना मागे टाकत रचलाय खास विक्रम
-केएल राहुल आयपीएलच्या इतिहासात ‘असा’ विक्रम करणारा बनला पाचवाच यष्टीरक्षक
ट्रेंडिंग लेख-
-नवलंच! आयपीएल २०२०मधील ३ धडाकेबाज फलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही
-IPL- दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये इशांत शर्माची जागा घेण्यास ३ खेळाडू तयार
-गौतम गंभीर का ठरला टीम इंडियासाठी संकटमोचक, हे दाखवून देणाऱ्या ३ खेळी