---Advertisement---

केएल राहुल आयपीएलच्या इतिहासात ‘असा’ विक्रम करणारा बनला पाचवाच यष्टीरक्षक

On: सोमवार, सप्टेंबर 21, 2020 2:05 PM
---Advertisement---

मुंबई । किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधाक केएल राहुल आयपीएलच्या इतिहासात पाचवा असा खेळाडू ठरला आहे, ज्याने एकाच सामन्यात कर्णधारपद, यष्टिरक्षण आणि सलामीला फलंदाजी देखील केली आहे. युएईमध्ये होत असलेल्या आयपीएल-13 व्या हंगामात राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करतोय. काल(२० सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कर्णधार म्हणून राहुलचा पहिलाच सामना होता.

राहुलच्या अगोदर अ‍ॅडम गिलक्रिस्ट, ब्रँडन मॅक्यूलम, कुमार संगकारा आणि पार्थिव पटेल यांनी आयपीएलच्या इतिहासात नेतृत्व करताना एकाच सामन्यात यष्टिरक्षण आणि डावाच्या सुरवातीला फलंदाजी केली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यान आयपीएल 2020 चा दुसरा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला. हा सामना सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने जिंकला होता. या सामन्याच्या विजयासह दिल्ली संघानेही गुणतालिकेमध्ये 2 महत्त्वाचे गुण मिळवले आहेत. या सामन्यात राहूलने 19 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 21 धावा केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---