मुंबई । चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो चार्टर्ड विमानाने आयपीएल 2020 मध्ये खेळण्यासाठी युएईला पोहोचला आहे. त्याने नुकतेच आपल्या संघाला त्रिनबॅगो नाइट रायडर्सला कॅरिबियन प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून दिले. युएईला पोहोचल्यानंतर त्याचे येथे उत्कृष्ट पद्धतीने स्वागत करण्यात आले. रविवारी ब्राव्होने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने हॉटेलच्या खोलीची झलक दाखविली.
युएईला पोहोचणे ब्राव्होसाठी अतिशय विशेष होते. कारण त्याची टीम चेन्नई सुपर किंग्जने येथे पोहोचण्यापूर्वी त्यांच्यासाठी एक खास योजना आखली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
युएईमध्ये आल्यानंतर ड्वेन ब्राव्हो आता एका आठवड्यासाठी क्वारंटाइन कालावधीत असेल. ज्या ठिकाणी ब्राव्हो थांबणार आहे, त्याच ठिकाणी सीएसकेने त्याला आश्चर्यचकित करण्याची योजना आखली. त्याच्यासाठी खास एक केकची व्यवस्था करण्यात आली होती, तो केक पूर्णपणे क्रिकेट स्टेडियम सारखा दिसतोय. तसेच त्याचे टी20 क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ड्वेन ब्राव्होने लिहिले की, “चॅम्पियन वेलकम … चेन्नईशी पुन्हा जोडल्यामुळे छान वाटलं.”
https://www.instagram.com/p/CFDP3axHeDB/
कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये ब्राव्होने सेंट लुसिया जूक्सविरुध्द रहीम कॉर्नवालला बाद करून टी20 क्रिकेटमध्ये 500 बळी मिळवण्याचा पराक्रम केला. त्यांच्या आधी कोणत्याही गोलंदाजाने 500 बळी घेतले नाहीत. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा टी – 20 क्रिकेटमध्ये 390 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत सुनील नरेन तिसर्या क्रमांकावर आहे, ज्याच्या खात्यात 383 बळी आहेत. त्याचबरोबर इम्रान ताहिरने एकूण 374 टी -20 बळी घेतले असून या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा सोहेल तन्वीर आहे, त्याने 356 टी20 बळी घेतले आहेत.