---Advertisement---

बुमराह नव्हे आयपीएलचे ‘हे’ सितारेही मागील वर्षात अडकलेत लग्नबंधनात, एक तर बनलाय बाबा

On: गुरूवार, मार्च 4, 2021 7:53 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. अशातच चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने बीसीसीआयला मागणी केली होती की त्याला चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी वैयक्तिक कारणास्तव रिलीज करण्यात यावे. या मागणीला मंजुरी देत बीसीसीआयने बुमराहला रिलीज केले होते. त्यानंतर बुमराह आठवड्याभरात विवाह करणार असल्याची चर्चा चालू आहे.

तसेच २०२०-२१ मध्ये लग्न करणारा बुमराह एकटाच क्रिकेटपटू नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज असलेल्या बुमराहपूर्वी बऱ्याच क्रिकेटपटूंनी मागील ९ महिन्यात विवाह केला आहे. हे क्रिकेटपटू देखील आयपीएलच्या कोणत्या-ना-कोणत्या संघाचे भाग आहेत. त्याच खेळाडूंचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.

गेल्या नऊ महिन्यात लग्नबंधनात अडकलेले आयपीएलमधील पाच क्रिकेटपटू-

५) बेन कटिंग-एरिन हॉलैंड :
ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग याने प्रसिद्ध मॉडेल आणि निवेदिका एरिन हॉलैंड यांचा नुकताच विवाह सोहळा पार पडला आहे. हे दोघेही गेल्या १० वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. बेन कटिंग मुंबई इंडियन्स संघातून खेळला आहे. तर एरिनने मिस ऑस्ट्रेलिया होण्याचा मान पटकावला आहे.

https://www.instagram.com/p/CLljQgpllBs/?utm_source=ig_web_button_share_sheet

४) युजवेंद्र चहल- धनश्री वर्मा :
भारतीय संघाचा आणि आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने लॉकडाऊनच्या काळात प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्मा हिच्यासोबत साखरपुडा केला होता. तसेच डिसेंबर महिन्यात त्यांनी विवाहदेखील केला होता. सध्या त्यांचे मालदीवमधील फोटोज् सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CJGrpDLMoAo/?utm_source=ig_web_button_share_sheet

३) जयदेव उनादकट-रिन्नी कटारिया :
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा जयदेव उनाडकट याने फेब्रुवारी महिन्यात रिन्नी कटारीया हिच्यासोबत विवाह केला होता. रिन्नी ही एक वकील आहे.

https://www.instagram.com/p/CK0-72ABhVH/?utm_source=ig_web_button_share_sheet

२) जयंत यादव – दिशा चावला :
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज जयंत यादव याने देखील फेब्रुवारी महिन्यात दिशा चावला हिच्यासोबत विवाह केला आहे. हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. जयंत यादव हा आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करतो.

https://www.instagram.com/p/CLWvNU5rlhc/?utm_source=ig_web_button_share_sheet

१) हार्दिक पंड्या – नताशा :
मुंबई इंडियन्स संघाचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने, प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री नताशा सोबत विवाह केला आहे. त्यांनी २०२० च्या सुरुवातीलाच साखरपुडा केला होता. त्यांनतर टाळेबंदीच्या काळात विवाह केला. त्यानंतर त्यांना पुत्र प्राप्ती देखील झाली होती.

https://www.instagram.com/p/CJa7r8dFlpJ/?utm_source=ig_web_button_share_sheet

महत्त्वाच्या बातम्या-

इम्रान ताहिरची संवेदनशीलता, विकेट घेताच ‘ही’ कृती करत वाहिली मित्राला श्रध्दांजली

एक, दोन नव्हेत तर तब्बल सलग सात षटकार! ‘या’ गोलंदाजाच्या नावे नकोसा विक्रम

कौतुकास्पद! षटकाराने तुटलेल्या खुर्चीवर मॅक्सवेलने केली सही, समाज कार्यासाठी होणार दान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---