आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने गोलंदाजी सराव सुरू केला आहे. असे म्हटले जात आहे की, इंग्लंडचा हा वेगवान गोलंदाज त्याच्या दुखापतीतून सावरला आहे. तसेच, त्याने नेट्समध्ये गोलंदाजीचा सरावही सुरू केला आहे. सोशल मीडियावर आर्चरचा सरावाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. आर्चर दुखापतीमुळे दीर्घकाळ मैदानापासून दूर होता, पण आता इंग्लंड आणि मुंबई इंडियन्ससाठी चांगली बातमी आहे की, तो आता मैदानावर परतला आहे.
जोफ्रा आर्चरने सरावाला केली सुरुवात
आयपीएल 2022च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने मोठी रक्कम मोजत जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याला आपल्या ताफ्यात सामील केले होते. मात्र, दुखापतीमुळे त्याला आयपीएल 2022 (IPL 2022) खेळू शकला नव्हता. आयपीएल 2022च्या मेगा लिलावापूर्वी हे निश्चित होते की, आर्चर या हंगामात खेळू शकणार नाही, परंतु तरीही रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील मुंबई संघाने त्याच्यावर मोठी रक्कम खर्च करत त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. आता आर्चरने सरावाला सुरुवात केली आहे, त्यामुळे असे म्हटले जात आहे की, मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनासाठी ही आनंदाची बातमी आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1577968686324977664?t=BrMb9Xe7DaBLdD1PguIQ3g&s=19
आयपीएल 2022मध्ये खेळला नव्हता आर्चर
यापूर्वी आर्चर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघासाठी खेळला आहे. इंग्लंडच्या तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळलेल्या आर्चरने आयपीएलमध्येही सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र, आयपीएल 2022मध्ये दुखापतींमुळे तो संपूर्ण हंगामातून बाहेर पडला होता. अशात मुंबई संघाला अपेक्षा असेल की, आर्चर आयपीएल 2023मध्ये मैदानावर परतेल.
आयपीएल 2022मध्ये 5 वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबईला खास कामगिरी करता आली नव्हती. त्यांच्यावर सातत्याने गुणतालिकेत तळाशी राहण्याची नामुष्की ओढावली होती. विशेष म्हणजे, त्यांना आयपीएल 2022साठी क्वालिफायदेखील करता आले नव्हते. आता आयपीएल 2023मध्ये आर्चर मुंबईच्या ताफ्यात सामील होऊन संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकून देण्यास मदत करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या ताटात खाल्ले, त्याच ताटात छेद! रबाडाचे आयपीएलबद्दल मोठे भाष्य; म्हणाला, ‘भारतीयांच्या कमजोरीविषयी…’
क्रिकेटला काळीमा फासणारी बातमी! आयपीएलच्या प्रसिद्ध खेळाडूला विमानतळावरून अटक, बला’त्काराचा आरोप






