कोलकता। आज आयपीएलच्या 12 व्या मोसमात दुसरा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद संघाचे नेतृत्व भुवनेश्वर कुमार करत आहे.
या सामन्याला सनरायझर्स हैद्राबादचा नियमित कर्णधार केन विलियम्सनला खांद्याच्या दुखापतीमुळे मुकावे लागले आहे. त्यामुळे आज हैद्राबाद संघाचे प्रभारी कर्णधारपद भुवनेश्वर कुमारकडे सोपवण्यात आले आहे.
भुवनेश्वर हा सनरायझर्स हैद्राबादचा एकूण सातवा कर्णधार ठरला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक कर्णधार असणाऱ्या संघांमध्ये हैद्राबाद दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.
या यादीत अव्वल क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स( पूर्वीचे नाव दिल्ली डेअरडेविल्स) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब आहेत. या दोन्ही संघांकडून प्रत्येकी 11 खेळाडूंनी आत्तापर्यंत नेतृत्व केले आहे.
सर्वाधिक कर्णधार असणारे आयपीएल संघ (सध्या खेळत असलेल्या आयपीएल संघापैकी)-
11 – किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली कॅपिटल्स
7 – सनरायझर्स हैद्राबाद
6 – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स
5 – राजस्थान रॉयल्स
4 – कोलकता नाईट रायडर्स
2 – चेन्नई सुपर किंग्ज
महत्त्वाच्या बातम्या-
–सनरायझर्स हैद्राबादचे आज नेतृत्व करणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा अनोखा विक्रम…
–आयपीएल २०१९: असे आहेत कोलकता-हैद्राबादचे ११ जणांचे संघ
–आयपीएल इतिहासात असा पराक्रम करणारा सुरेश रैना ठरला पहिलाच खेळाडू