---Advertisement---

पाचव्या पराभवानंतर एमएस धोनीचा चेन्नई संघ झाला जोरदार ट्रोल; पाहा काही खास ट्विट्स

On: रविवार, ऑक्टोबर 11, 2020 2:22 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये शनिवारी (10 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने चेन्नई सुपर किंग्सला 37 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 20 षटकांत 4 बाद 169 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने 52 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 90 धावांची शानदार नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात सीएसके केवळ 132 धावाच करू शकला. सीएसकेचा या हंगामातील हा 5 वा पराभव होता. या संघानी या हंगामात केवळ 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, बेंगलोरने खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत.

सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने फिरकीपटू युजवेन्द्र चहलच्या चेंडूवर षटकार ठोकला, पण त्यानंतर परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात तो सीमारेषेवर झेलबाद झाला. सीएसकेमधील कोणताही फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकला नाही. कर्णधार एमएस धोनी आणि त्याच्या संघाच्या खराब कामगिरीमुळे ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी धोनीसह चेन्नई संघावर टिका केली आहे. यातील काही खास प्रतिक्रिया पाहाणार आहोत.

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉ म्हणाला की मला भीती वाटते की कदाचित आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे सुवर्ण दिवस संपत आहेत.

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, “चेन्नईच्या खराब कामगिरीमुळे चाहाते निराश झाले हे पाहून वाईट वाटते, हा लढणारा संघ म्हणून ओळखला जायचा पण खराब फलंदाजीमुळे या संघाने निराश केले.” तसेच त्याने या सामन्यात विराटने केलेल्या नाबाद 90 धावांच्या खेळीचे कौतुक केले आहे.

काही चाहत्यांच्या प्रतिक्रिया – 

https://twitter.com/firkey_/status/1314978370128498688?s=20

https://twitter.com/the_topspin/status/1314979253704970243?s=20

https://twitter.com/Sarcastickalra/status/1314982273180147714?s=20

https://twitter.com/theamarone/status/1314982263960948736?s=20

 

चेन्नईचे फलंदाज टी नटराजन आणि अंबाती रायडू यांनी तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची एक भागीदारी केली होती. मात्र नटराजन बाद झाला आणि चेन्नईचा डावही पत्त्यांसारखा कोसळला. आता चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना 13 ऑक्टोबरला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. हा सामना दुबईमध्ये होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---