---Advertisement---

आयपीएलमध्ये केवळ खेळाडूच नाही तर पंचांनाही मिळतो भक्कम मोबदला! एका सामन्याची ‘एवढी’ फी, आंतरराष्ट्रीय टी20…

On: बुधवार, मार्च 18, 2026 7:00 PM
---Advertisement---

लीग क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध ती म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल). यामध्ये नेहमी खेळाडूंना मिळणाऱ्या कोटी रकमेची चर्चा होत असते, मात्र सामन्यावेळी मैदानावर उभ्या असणाऱ्या पंचांच्या पगाराची मात्र चर्चा सहसा होत नाही. पंच क्रिकेटच्या नियमांचे रक्षणकर्ता आणि त्यांच्यावर करोडो चाहत्यांची नजर असते. दबावाच्या या स्पर्धेत त्यांची भुमिका महत्वाची ठरते. त्यांना एका सामन्याचे किती मानधन मिळते हे जाणून घेऊ.

काही रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या मैदानावरील (ऑन-फिल्ड) पंचांना एका सामन्यासाठी जवळपास ३ लाख रुपये मिळतात. थर्ड अंपायर आणि फोर्थ अंपायरला प्रत्येक सामन्यामागे २ लाख रुपये मिळतात. तसेच काही आयसीसीचे सदस्य आणि अनुभवी पंचांना प्रत्येक सामन्यामागे ३.७ लाख रुपये मिळतात. ज्युनियर पंचांना प्रत्येक सामन्यासाठी ६० हजार रुपये मिळतात. वरील रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.

प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांसारख्या मोठ्या सामन्यांमध्ये मानधनाची रक्कम अधिक असते. एलिट पंचाना प्लेऑफमध्ये ५-८ लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. तसेच अंतिम सामन्याच्या रकमेत वाढही होऊ शकते. त्यामुळे एका हंगामात १२-१५ सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले तर त्या एका व्यक्तिची २५-४० लाख रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक रक्कमेची कमाई होते. त्याचबरोबर सर्व पंचांना अंदाजे ७.३३ लाख रुपयांचे निश्चित हंगामी मानधन, प्रवास, निवास आणि इतर भत्ते मिळतात.

आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमधील पंचांच्या मानधनाची तुलना केली, तर त्यामध्ये मोठा फरक आहे. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये पंचांना एका सामन्यासाठी १.१३ ते १.२५ लाख रुपये मिळतात. यावरून आयपीएलचे पंच आंतरराष्ट्रीय पंचांपेक्षा अडीच पट अधिक पैसे कमावतात. याचे श्रेय आयपीएल लीगच्या प्रचंड महसुलाला व व्यावसायिक रचनेला जाते. umpire salary per match in ipl

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---