---Advertisement---

हार्दिक पांड्याला टी20 विश्वचषकात जागा मिळणार नाही? माजी मुख्य निवडकर्त्यानं केलं मोठं विधान

---Advertisement---

टी20 विश्वचषकात कोणता खेळाडू निवडायचा यात निवडकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विश्वचषकात निवड होण्यासाठी आयपीएल 2024 मध्ये प्रत्येक खेळाडू आपले संपूर्ण योगदान देत आहे. या पार्श्वभूमीवर माजी भारतीय खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी हार्दिक पांड्याबाबत मोठं विधान केलं आहे.

प्रसाद यांच्या मते, आगामी टी20 विश्वचषकात हार्दिकला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. दिग्गज खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांच्यानुसार विराट कोहली आणि रोहित शर्मा संघात असल्यामुळे हार्दिकला संघात जागा मिळणार नाही. यातच संघ व्यवस्थापनात सर्वात जास्त चर्चा विकेटकीपर फलंदाजावरून होत आहे.

सोशल मीडिआ प्लॅटफॉर्म ‘X’ वर व्यंकटेश प्रसाद यांनी पोस्ट केली की, “माझ्यामते फिरकी गोलंदाज म्हणून शिवम दुबे चांगला ठरेल. जगातील उत्तम टी 20 फलंदाज सूर्यकुमार यादव आणि एक जबरदस्त फिनिशर म्हणून रिंकू सिंह यांची निवड व्हावी. टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघामध्ये या 3 खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये जागा मिळायला हवी.” विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या व्यतिरिक्त फक्त एकाच यष्टीरक्षक फलंदाजाला स्थान दिलं जाणार आहे. आता निवडकर्ते कोणाला स्थान देतील हे पाहणं मनोरंजक असणार आहे.

टी20 विश्वचषक 2024 अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये आयोजित केला जाणार आहे. आयसीसीनं संघ निवडीसाठी 1 मे ही शेवटची तारीख सांगितली आहे. भारतीय संघाची निवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते. त्यामुळे निवडकर्ते आयपीएलमधील खेळाडूंच्या प्रदर्शनावर लक्ष देत आहेत. अशातचं कोणता खेळाडू निवडकर्त्यांच्या नजरेत येईल आणि टी 20 विश्वचषकात आपलं स्थान निश्चित करेल, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पांड्या बंधूंनी गायलं ‘हरे रामा-हरे कृष्णा’, भजनाच्या तालावर बेधुंद नाचले!

‘सर’ जडेजानं केली ‘थाला’ची बरोबरी, एमएस धोनीचा आयपीएलमधील मोठा रेकॉर्ड धोक्यात

लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---