---Advertisement---

IPL: कोहलीचा ‘विराट’ विक्रम; ही आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल – खरा किंग एकच!

Virat-Kohli-Statement
---Advertisement---

आयपीएलच्या इतिहासात अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ज्यामध्ये एमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या महान खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी आपापल्या संघांसाठी अभूतपूर्व योगदान दिले असून अनेक विक्रमही प्रस्थापित केले आहेत. विशेषतः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा आयपीएलमधील सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 8 शतके झळकावली आहेत, जो एक अभेद्य विक्रम आहे. त्याने आपल्या आक्रमक आणि तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर अनेकदा संघाला विजय मिळवून दिला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतकांची यादी पाहिल्यास, त्याच्या जवळ केवळ जोस बटलर आहे, ज्याने 7 शतके झळकावली आहेत. त्याचप्रमाणे ख्रिस गेलने 6, के. एल. राहुल आणि डेव्हिड वॉर्नर यांनी प्रत्येकी 4 शतके झळकावली आहेत.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके (Most Centuries in IPL History)

विराट कोहली: 8 शतके
जोस बटलर: 7 शतके
ख्रिस गेल: 6 शतके
केएल राहुल: 4 शतके
डेव्हिड वॉर्नर: 4 शतके

विराट कोहलीची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द शानदार राहिली आहे. त्याने आतापर्यंत 252 सामन्यांमध्ये 38.69 च्या सरासरीने 8004 धावा केल्या आहेत. ज्यात त्याचा स्ट्राईक रेट 131.95 आहे, जो अत्यंत प्रभावी मानला जातो. या दरम्यान त्याने 8 शतके आणि 55 अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीची खेळावरची निष्ठा आणि फिटनेसकडे दिलेले प्राधान्य यामुळे तो आजही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. (Virat Kohli IPL Career Runs and Centuries)

आयपीएलच्या मागील हंगामात 2024 मध्येही विराट कोहलीने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. त्याने 15 सामन्यांच्या 15 डावांमध्ये 64.36 च्या सरासरीने आणि 155.60 च्या स्ट्राईक रेटने 741 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. या दमदार खेळीमुळे तो संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला. (Virat Kohli IPL Stats 2024)

विराट कोहलीच्या कामगिरीचा विचार करता, तो अद्यापही नव्या उंचीवर पोहोचण्यास सक्षम आहे. त्याचा सातत्यपूर्ण सराव, खेळावरची निष्ठा आणि संयम हे त्याला इतर खेळाडूंंपेक्षा वेगळं ठरवतात. त्यामुळे भविष्यात तो आणखी विक्रम प्रस्थापित करेल, याबाबत कोणतेही दुमत नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---