जगभरात जेवढ्या टी२० लीग स्पर्धा आहेत, त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि मोठी लीग स्पर्धा म्हणून इंडियन प्रीमिअल लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलला ओळखले जाते. आयपीएलमध्ये जगभरातील खेळाडू खेळतात. मात्र, पाकिस्तानी खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्यावर बंदी आहे. त्यामुळे आयपीएलला पर्याय म्हणून पाकिस्तानमध्ये पाकिस्तान प्रीमिअर लीग (Pakistan Premier League) म्हणजेच पीएसएलचे आयोजन केले जाते. अशात दोन्ही स्पर्धांमधील सर्वोत्तम कोणती? असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर पाकिस्तानी वंशाच्या पण ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या खेळाडूने दिले आहे.
आयपीएलचे आयोजन भारतात, तर पीएसएलचे आयोजन पाकिस्तानात होते. दोन्ही देश एकमेकांचे शेजारी असल्यासोबतच क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांचे कट्टर दुष्मनही आहेत. जेव्हाही दोन देशांचा आंतरराष्ट्रीय सामना असतो, तेव्हा सामन्याची मजा काही औरच असते. मात्र, आपापसांतील मतभेदांमुळे भारत- पाकिस्तान संघात आता कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही.
भारत आणि पाकिस्तान फक्त आणि फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येतात. इतकेच नाही, तर आयपीएलमध्येही पाकिस्तानी खेळाडूंच्या खेळण्यावर बंदी आहे.
ही स्पर्धा आहे जगातील सर्वोत्तम लीग
खरं तर, ऑस्ट्रेलियन संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तानात पोहोचला आहे. या दौऱ्याची सुरुवात ४ मार्चपासून कसोटी मालिकेने होत आहे. या दौऱ्यात ३ कसोटी, ३ वनडे आणि एक टी२० सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) माध्यमांशी संवाद साधला. इंडियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोणती लीग सर्वोत्तम आहे? असे विचारले असता, यावर उस्मानने आयपीएलला जगातील सर्वोत्तम लीग सांगितले.
पाकिस्तानी वंशाचा आहे उस्मान ख्वाजा
उस्मान ख्वाजा हा पाकिस्तानी वंशाचा आहे. बर्याच दिवसांनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाल्यावर ख्वाजा म्हणाला की, “आयपीएल ही जगातील सर्वोत्तम लीग आहे, त्याची कोणत्याही लीगशी तुलना होऊ शकत नाही. आयपीएल ही एकमेव लीग आहे ज्यामध्ये भारतीय खेळाडू खेळतात. यामुळे ही लीग जगातील सर्वोत्तम लीग ठरते. आयपीएल आणि पीएसएलमध्ये तुलना नाहीये.”
ख्वाजाबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा जन्म पाकिस्तातच्या रावळपिंडी येथे झाला होता. कराची शहरदेखील त्याच्या हृदयाच्या जवळ आहे. कारण, तिथे त्याची नातेवाईक राहतात.
त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४६ कसोटी सामने, ४० वनडे सामने आणि ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ४२.४५ च्या सरासरीने ३१४२ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ४२ च्या सरासरीने १५५४ धावा केल्या आहेत, तर टी२०त २६.७७ च्या सरासरीने २४१ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ शतकेही ठोकली आहेत.
कोरोना संक्रमित राउफच्या जागी ‘या’ हॅट्रिकवीराची पाकिस्तानच्या कसोटी संघात वर्णी, करणार पुनरागमन