आयपीएल 2021 च्या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपल्या संघातील मुक्त आणि कायम केलेल्या खेळाडूंची, माहिती बुधवारी (20 जानेवारी) दिली. यामध्ये बर्याच संघांनी आयपीएलच्या 14 व्या हंगामापूर्वी आपल्या संघातील दिग्गज खेळाडूंना संघातून मुक्त केले आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या स्पर्धेपूर्वी स्टार गोलंदाज लसिथ मलिंगाला आपल्या संघातून मुक्त केले आहे. मलिंगाने फ्रँचायझी क्रिकेटमधू निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याने त्याला मुक्त करण्यात आले. त्यामुळे संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे मलिंगाबद्दल भावूक झाले आहेत.
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने लसिथ मलिंगाबद्द्ल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील ट्विटरवरुन लसिथ मलिंगाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. लसिथ मलिंगा हा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याने मुंबई इंडियन्स संघाला आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कित्येक सामने जिंकून दिले आहेत.
जसप्रीत बुमराहने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून लसिथ मलिंगाबद्दल असलेल्या भावना व्यक्त करताना लिहले आहे की, “तुमच्या सोबत खेळणे, हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. इतके वर्षे मी तुमच्याकडून शिकले आहे. एका यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा. तुमच्या शिवाय आयपीएल पहिल्यासारख असणार नाही.” जसप्रीत बुमराहने आपल्या या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सला सुद्धा टॅग केले आहे.
It’s been an honour playing alongside you and picking your brain all these years, Mali. Congratulations on a successful career, the IPL won’t be the same without you. @mipaltan pic.twitter.com/9XIPr13dtN
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) January 21, 2021
त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी सुद्धा इंस्टाग्रामवर पोस्ट करताना लसिथ मलिंगाबद्दल लिहले आहे, की मलिंगा मॅचविनर असून त्याची कमी भासेल.
https://www.instagram.com/p/CKTNrPxB1RP/?igshid=3sxcd7ykuzjj
लसिथ मलिंगाने फ्रेंचायजी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा स्टार गोलंदाजी लसिथ मलिंगाने बुधवारी (20 जानेवारी) फ्रेंचायजी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. त्याने या बाबत मुंबई इंडियन्स संघाच्या मॅनेजमेंटला अगोदरच तसे कळवले होते. त्याने मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटला सांगितले होते की, तो आयपीएल च्या चौदाव्या हंगामात सहभागी होणार नाही.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज
मुंबई इंडियन्स संघाचा 37 वर्षीय गोलंदाज लसिथ मलिंगा हा आयपीएल 2008 पासून मुंबई इंडियन्स संघासोबत जोडला गेला होता. त्याने आयपीएल स्पर्धेत आपल्या दमदार कामगिरीने मुंबई संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. मुंबई इंडियन्स संघाने 2018 साली त्याला आपल्या संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर लगेच 2019 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने त्याला आपल्या संघाचा गोलंदाज म्हणून संघात स्थान दिले होते. त्याने आपल्या कारकीर्दीत आयपीएलचे 122 सामने खेळताना 170 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 2011 साली 28 विकेट्स घेवून पर्पल कॅप मिळवली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
एक केदार जाधव गेला अन् दुसरा आला! सीएसकेच्या ताफ्यात सहभागी झालेला उथप्पा चाहत्यांकडून ट्रोल
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका हा संघ जिंकेल, मायकल वॉन यांची पुन्हा भविष्यवाणी
राम मंदीर उभारणीसाठी गौतम गंभीरचा हातभार; दिली ‘एवढ्या’ रुपयांची देणगी