भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांंगुली यांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) बाबत मोठी घोषणा केली आहे. पुरूषांचा 2023चा आयपीएल हंगाम कुठे खेळला जाणार हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी महिला आयपीएलबाबतही विशेष माहिती दिली असून स्थानिक क्रिकेटच्या सर्व स्पर्धाही खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविड 19 नंतर पुन्हा एकदा पुरूषांचे आयपीएल पहिल्याप्रमाणे खेळले जाणार आहे. आधीच्या आयपीएलमध्ये संघ घरच्या आणि विरोधी संघाच्या मैदानावर सामने खेळत असत. हीच पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. यामुळे 2023 हंगामातील सर्व 10 संघ घरच्या आणि विरोधी संघाच्या मैदानावर सामने खेळणार आहेत. 2020चा हंगाम बाहेर खेळला गेला. हा हंगाम युएईच्या दुबई, शारजाह आणि अबुधाबी येथे खेळला गेला. 2021चा हंगामही दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि चेन्नई येथे खेळला गेला तर काही सामने पुन्हा एकदा युएईमध्ये खेळवण्यात आले. आयपीएल 2022चे सामनेही मुंबई, पुणे, कोलकाता आणि अहमदाबाद येथेच खेळले गेले.
महिला आयपीएल व्यतिरिक्त पुढील वर्षी 15 वर्षाखालील मुलींची क्रिकेट स्पर्धाही सुरू केली जाणार आहे. महिला क्रिकेटमध्ये या स्पर्धेमुळे बदल होईल यासाठी हा निर्णय घेण्यात आला असे बीसीसीआयने म्हटले आहे. ही स्पर्धा 26 डिसेंबर ते 12 जानेवारी दरम्यान बंगळुरू, रांची, राजकोट, इंदोर, रायपूर आणि पुणे येथे खेळवली जाणार आहे.
भारतीय पुरूष संघ टी20 विश्वचषकानंतर श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे, तर महिला संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका खेळणार आहेत. तसेच बीसीसीआय 2020 नंतर प्रथमच स्थानिक क्रिकेटच्या पूर्ण हंगामातील स्पर्धेचे आयोजन करत आहे. ज्यामध्ये संघ जुन्या पद्धतीनुसार घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर खेळणार आहेत. याचा अर्थ 2023मध्ये इराणी कप स्पर्धा खेळवली जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया2022 स्पर्धेच्या यजमान शहराच्या लोगोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते अनावरण
INDvsAUS: हैद्राबादमध्ये तिकीटांसाठी चाहत्यांच्या लांबच लांब रांगा; पोलिसांचा लाठीचार्ज, जखमींचा आकडा…
बापरे! तब्बल २२ क्रिकेटपटूंच्या ऑटोग्राफला मिळाला होता केवळ एक रुपया