आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (५ मे) अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज भिडले. यामध्ये सीएसकेच्या स्टार फलंदाजाने पुन्हा एकदा सामना विजयी खेळी केली. संजू सॅमसनने नाबाद ८७ धावांची खेळी करत विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले. त्याचबरोबर त्याने बलाढ्य क्रिस गेलचा विक्रम मागे टाकला.
संजूने आयपीएलच्या १९ व्या हंगामात डीसीविरुद्ध एक विशेष द्विशतक पूर्ण केले असून आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा केवळ तिसराच खेळाडू ठरला आहे. एका हंगामाच्या एकाच संघाविरुद्ध २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे विराट आणि राहुल केवळ हे दोनच खेळाडू होते. आता अशी कामगिरी संजूनेही केली आहे.
विराटने २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध दोन शतकांसह २०९ धावा केल्या होत्या. त्या हंगामात त्याने १६ डावांमध्ये ९७३ धावांचा पाऊस पाडला होता, जो एका आयपीएल हंगामात सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम आहे. राहुलने २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध २०६ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने दोन शतके केली होती. त्यामुळे तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. संजू डीसीविरुद्ध २०२ धावा करत तिसऱ्या स्थानी आला आहे.
आयपीएलच्या एका हंगामात (लीग टप्प्यात) एका खेळाडूने प्रतिस्पर्ध्याविरुद्ध केलेल्या सर्वाधिक धावा
२०९ – विराट कोहली वि. गुजरात लायन्स २०१६ (१००* आणि १०९)
२०६ – केएल राहुल वि. मुंबई इंडियन्स, २०२२ (१०३* आणि १०३)
२०२ – संजू सॅमसन वि. दिल्ली कॅपिटल्स, २०२६ (११५ आणि ८७)
१९६ – क्रिस गेल वि. पुणे वॉरियर्स इंडिया, २०१३ (१७५ आणि २१)
१९३ – केएल राहुल वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०२० (१३२* आणि ६१*)






