बेंगलोर। आजचा आयपीएलमधील सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स असा रंगणार आहे. हा सामना रात्री 8 वाजता बेंगलोर येथे होणार आहे.
मुंबई-बेंगलोर हे दोन्ही संघ 7 पैकी 2 सामने जिंकून गुणतालिकेत अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात हरलेल्या संघासाठी पुढची वाट अवघडच आहे. म्हणूनच या दोन्ही संघांना आज विजय मिळवणे आवश्यकच आहे.
मागील दोन सामन्यात बेंगलोर संघाने प्रतिस्पर्धी संघासमोर मोठे लक्ष्य ठेऊन सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला आहे. हे सामने ते शेवटच्या षटकात हरले आहेत. म्हणूनच शेवटच्या षटकातील गोलंदाजी त्यांची चिंतेची बाब आहे.
ख्रिस वोक्स ( 5 सामन्यात 8 विकेट्स ), युजवेंद्र चहल( 7 सामन्यात 8 विकेट्स ) आणि उमेश यादव ( 7 सामन्यात 9 विकेट्स ) असे गोलंदाज असूनही त्यांना पहिल्यापासूनच गोलंदाजीत अपयश येत आहे. यामध्ये अजूनतरी सुधारणा घडून नाही आल्या.
बेंगलोरची फंलदाजी तुफान आहे. विराट कोहली( 7 सामन्यात 317 धावा ), एबी डिव्हिलियर्स( 6 सामन्यात 280 धावा ),क्विंटॉन डी कॉक( 7 सामन्यात 194 धावा ) आणि मंदीप सिंग( 7 सामन्यात 190 धावा ) असे फंलदाज संघात अाहेत. त्यांनी आत्तापर्यंत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास हातभार लावला आहे.
रोहित शर्माच्या संघाने मागच्या सामन्यात धोनीच्या संघाला 8 विकेट्सने घरच्याच मैदानात पराभूत केले. या सामन्यात रोहितने 33 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली होती.
मुंबईकडे फंलदाजीत सुर्यकुमार यादव( 7 सामन्यात 274 धावा ), एविन लेवीस( 7 सामन्यात 194 धावा ), रोहित शर्मा ( 7 सामन्यात 196 धावा ) तसेच त्यांच्या साथीला ईशान किशन, अष्टपैलू कृणाल पांड्या ( 7 सामन्यात 113 धावा, 8 विकेट्स) हे आहेत.
गोलंदाजीत मंयक मरकंडे ( 7 सामन्यात 10 विकेट्स ), हार्दीक पांड्या ( 6 सामन्यात 8 विकेट्स ), मुस्तफिजूर रहमान( 6 सामन्यात 7 विकेट्स ) आणि जसप्रीत बुमराह( 7 सामन्यात 8 विकेट्स ) असे पर्याय उपलब्ध आहेत.
या मोसमात 17 एप्रिलला झालेल्या सामन्यात मुंबईने बेंगलोरला 46 धावांनी हरवले होते.
कधी होईल आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा 31वा सामना आज, 1 मेला होणार आहे.
कुठे होईल आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आजचा सामना एम चिन्नस्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे होईल.
किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.
यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार ), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस वोक्स, ब्रेंडन मॅक्युलम, क्विंटॉन डी कॉक, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मंदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, सर्फराज खान, मोहम्मद सिराज, मोईन अली, कोरे अॅण्डरसन, मुरूगन अश्विन, अनिकेत चौधरी, कोलीन डी ग्रॅनधोमे, पवन देशपांडे, अनिरूध्द जोशी, कुलवंत खेर्जोलिया, पवन नेगी, पार्थिव पटेल, नवदिप सैनी, टीम साउथी, मनन वोहरा
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार ), जसप्रीत बुमराह, सुर्यकुमार यादव, ईशान किशन , एविन लेवीस, मंयक मरकंडे, मिशेल मॅकलॅंघन, मुस्तफिजूर रहमान, हार्दीक पांड्या, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड, राहुल चहर, बेन कटिंग, अखिला धंनजया, जे पी ड्युमिनी, सिध्देश लाड, शरद लुंबा, अडम मिलने, मोहसीन खान, एम डी निधीष, अनुकूल रॉय, प्रदिप संघवान,ताजिंदर सिंह, आदित्य तारे, सौरभ तिवारी
महत्त्वाच्या बातम्या –
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियमला अजिंक्यपद
–धोनीचा हा विक्रम फक्त विराटच मोडू शकतो!
–मला त्यांनी साधा फोनही केला नाही याचे जास्त वाईट वाटले- ख्रिस गेल
–म्हणून किदांबी श्रीकांतला सनरायर्जस हैद्राबादच्या चाहत्यांनी ट्रोल केले
–दादाच्या बॅटची काळजी घ्यायचा सचिन