---Advertisement---

विराट-चहलची चपळाई हिटमॅनला भारी, रोहित शर्मा ‘असा’ झाला रनआऊट

On: शुक्रवार, एप्रिल 9, 2021 8:23 PM
---Advertisement---

चेन्नई। आजपासून (९ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला सुरुवात झाली. या हंगामातील पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. मात्र, मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा धावबाद झाला आहे.

झाले असे की मुंबईकडून ख्रिस लिन आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने एक खणखणीत षटकार देखील मारला होता. मात्र, डावाच्या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर लिनने एक फटका खेळला. त्यावर एकेरी धाव घ्यायची म्हणून रोहितने पळायला सुरुवात केली. पण लिनने दोन पाऊले पुढे आल्यावर चेंडू विराट कोहलीने पकडलेला पाहिला आणि धाव घेण्यास नकार दिला. यावेळी रोहित खेळपट्टीच्या मध्ये आला होता.

त्याचवेळी चपळाईने विराटने नॉन-स्ट्रायकर एन्डला चेंडू फेकला. तिथे उभ्या असलेल्या युजवेंद्र चहलने चेंडू पकडत रोहित क्रिजमध्ये येण्यापूर्वीच स्टंपवरील बेल्स उडवल्या. त्यामुळे रोहितला १५ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह १९ धावा करुन माघारी परतावे लागले.

बेंगलोरने जिंकली नाणेफेक

एमए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी मुंबईने ख्रिस लिन आणि मार्को जेन्सन यांना अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली. या दोघांनीही मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केले.

तसेच बेंगलोरने नुकत्याच कोविड-१९ या आजारातून बऱ्या झालेल्या देवदत्त पडीक्कलला आराम दिला. त्यांच्याकडून रजत पाटिदार पदार्पण केले. त्याचबरोबर या सामन्यासाठी बेंगलोरने ग्लेन मॅक्सवेल, काईल जेमीसन आणि डॅन ख्रिस्टियनलाही संधी दिली.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतातून मिळणाऱ्या प्रेमाची डिविलियर्सने केली परतफेड, भारतीयांबद्दल केले मन जिंकणारे भाष्य

क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात: टॉस जिंकून बंगळुरुचा प्रथम बॉलिंगचा निर्णय; विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ सज्ज

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नवे अँथम साँग ऐकले का? यंदा काय आहे विशेष पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---