जगभरातील अनेक देशांप्रमाणेच भारतातही सध्या कोरोना व्हायरसचा विळखा पडला आहे. याचा फटका अनेक क्षेत्रांना बसत आहे. त्यातच ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला भारतात सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व आयपीएल संघांची त्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे. याबरोबरच बीसीसीआय देखील संघांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत आहे. मात्र हा हंगाम सुरु होण्याआधी चेन्नई सुपर किंग्स संघातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे वृत्त आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी (३ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स संघातील एका सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण चांगली गोष्ट अशी की हा सदस्य खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ मधील नाही.
एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार हा सदस्य चेन्नई संघाच्या कटेंट टीममधील आहे. तसेच त्याने स्वत:ला संपूर्ण संघापासून वेगळे केले असून, तो सध्या एकांतवासात आहे. तसेच तो कोणत्याही खेळाडूच्या किंवा सपोर्ट स्टाफच्या जवळ गेलेला नाही. त्यामुळे ते सर्वजण सुरक्षित असून नेहमीप्रमाणे सराव करणार आहेत.
चेन्नई सुपर किंग्सला मागीलवर्षाचा अनुभव
मागीलवर्षी आयपीएलचा हंगाम युएईमध्ये पार पडला होता. त्यावेळी १३ वा हंगाम सुरु होण्याच्या आधीच त्यांच्या संघातील दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड हे दोन खेळाडू, तसेच काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
पण यंदा पुर्ण सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले आहे. सुत्राने असेही सांगितले आहे की सर्व नियम पाळले जात आहेत.
वानखेडे स्टेडियमचे ८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
वानखेडे स्टेडियम हे आयपीएल २०२१ साठी एक प्रमुख स्टेडियम आहे. मात्र, हा आयपीएल हंगाम सुरु होण्याआधीच वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफमधील एक-दोन नव्हे तब्बल आठ सदस्य कोरोनाच्या कचाट्यात सापडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे या स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात १० एप्रिलला सामना होणार आहे. या सामन्याशिवाय एकूण या स्टेडियमवर आयपीएल २०२१ चे एकूण १० सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता वानखेडे स्टेडियमवर सामने आयोजित होण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी येतोय,’ शानदार फॉर्ममध्ये असलेला आरसीबीचा शिलेदार भारतासाठी रवाना; १८ चेंडूत केलंय अर्धशतक
बिग ब्रेकिंग! आयपीएलपुर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह
हाव क्यूट! आयपीएलपुर्वी कॅप्टन रोहितचा रोमँटिंक अंदाज, पत्नीसोबत काढला ‘सुपरक्यूट फोटो’