इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२ स्पर्धेतील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि लखनौ सुपर किंग्ज (एलएसजी) या संघात झाला. लखनौ संघाचा कर्णधार केएल राहुल याने टॉस जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, राहुलचा (KL Rahul) हा निर्णय त्याच्या गोलंदाजांना योग्य असल्याचे सिद्ध करता आले नाही.
चेन्नई संघाच्या सलामीवीरांनी सामन्याच्या पहिल्या षटकापासून लखनौ संघाच्या गोलंदाजीची पिसे काढायला सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड जरी स्वस्तात बाद झाला तरीही उथप्पा आणि मोईन अली यांनी चौकार-षटकारांची आतिशबाजी सुरुच ठेवली. प्रत्येक षटकात धावांचे मजले रचत सीएसकेने लखनौ सुपर जायंट्स संघाला अगदी जेरीस आणले. (LSG vs CSK IPL 2022)
चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) फलंदाजांनी केलेल्या धुवांधार फलंदाजीच्या जोरावर सीएसकेने लखनौ संघाविरुद्ध खेळताना आयपीएलमध्ये काही खास सांघिक रेकॉर्ड बनवलेत. हे सर्व रेकॉर्ड विरुद्ध संघाविरुद्ध धमाकेदार फलंदाजी करण्याबाबत असल्याने सीएसकेसाठी जरी हे अभिमानास्पद असले, तरीही प्रतिस्पर्धी लखनौ (LSG) संघासाठी ही लज्जास्पद कामगिरी आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुलसाठी हे रेकॉर्ड विसरणे तसे अशक्य आहे.
आयपीएलमध्ये सीएसके संघाची पॉवर प्लेमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी…
१००/२ वि. पंजाब, वानखेडे स्टेडिय २०१४
९०/० वि. मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम २०१५
७५/१ वि. कोलकाता नाईट रायडर्स, एम ए चिदंबरम स्टेडियम २०१८
७३/१ वि. लखनौ सुपर जायंट्स, ब्रेब्रॉर्न स्टेडियम २०२२*
आजवर सर्व संघाविरुद्ध सामने खेळल्यानंतर चेन्नईने सर्वाधिक चोप दिलेल्या संघांमध्ये आता लखनौ चौथ्या स्थानी आला आहे.
दहा षटकात चेन्नईकडून सामन्यात सर्वाधिक चौकार…
२२ वि. मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम २०१५
१९ वि. पंजाब किंग्ज, वानखेडे स्टेडियम २०१४
१८ वि. लखनौ सुपर जायंट्स, ब्रेब्रॉर्न स्टेडियम २०२२*
सीएसके संघाने प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळताना पहिल्या १० षटकांत ठोकलेले सर्वाधिक चौकार या यादीतही आता लखनौ संघ क्रमांक तीनवर आला आहे.
(IPL2022 CSK Highest Score in Power Play And Hits More Boundaries vs LSG)
अधिक वाचा –
द ग्रेट धोनी.! LSG विरुद्धच्या सामन्यात MS DHONI कडून कारकिर्दीतील अविस्मरणीय विक्रमाला गवसणी
सीएसकेने दिली आणखी एका मराठमोळ्या खेळाडूला संधी; घ्या त्याच्याबद्दल जाणून
आरसीबीच्या ‘मॅन ऑफ द मॅच’ हसरंगाच्या स्पेशल सेलिब्रेशनने लुटली मैफील, जाणून घ्या त्यामागचे कारण