---Advertisement---

सीएसकेने दुसऱ्या सामन्यात दिली आणखी एका मराठमोळ्या खेळाडूला संधी; जाणून घ्या त्याच्याबद्दल

On: गुरूवार, मार्च 31, 2022 10:03 PM
mukesh choudhary csk
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या ७ व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला गोलंदाजीचे आमंत्रण दिले. या सामन्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेन्नईने आपल्या संघात तीन बदल केले. प्लेइंग इलेव्हनमध्य कमी बदल करणाऱ्या चेन्नईने ऍडम मिल्ने, मिचेल सँटनर आणि डेव्हन कॉनवे यांच्या जागी मोईन अली, ड्वेन प्रिटोरियस आणि मुकेश चौधरी यांना स्थान देण्यात आले आहे. मोईन अली आणि ड्वेन प्रिटोरियस ही नावं तर ओळखीची आहेत. पण, हा मुकेश चौधरी कोण आहे हा प्रश्न आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये मुकेश चौधरीचे नाव पाहून अनेक चाहत्यांना धक्का बसला. ज्याच्यावर चेन्नईने एवढा विश्वास व्यक्त केला आहे, तो कोण असा खेळाडू आहे, असे चाहत्यांना प्रश्न पडत आहेत.

कोण आहे हा मुकेश चौधरी
मुकेश चौधरी महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. हा खेळाडू वेगवान गोलंदाज आहे आणि गेल्या मोसमात चेन्नईला चॅम्पियन बनवण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापन स्वतः हे मान्य करते की, गेल्या आयपीएल हंगामात मुकेश चौधरी चेन्नईचा नेट बॉलर होता. या खेळाडूने धोनीसह इतर फलंदाजांना त्याच्या लाइन लेंथ आणि वेगाने प्रभावित केले आहे. आणि यामुळेच चेन्नईने आयपीएल २०२२ च्या लिलावात या गोलंदाजला खरेदी केले.

स्विंग गोलंदाजी हे मुकेश चौधरीची ताकद आहे. याशिवाय त्याचा वेगही चांगला आहे. २५ वर्षीय गोलंदाजाने महाराष्ट्रासाठी १३ प्रथम श्रेणी सामने, १२ लिस्ट ए सामने खेळले आहेत. याशिवाय मुकेश चौधरीकडे १२ टी२० सामन्यांचा अनुभव आहे. मुकेश चौधरीने ३८ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याच्या नावावर लिस्ट ए मध्ये १७ विकेट आहेत. त्याने टी२० क्रिकेटमध्ये १६ विकेट घेतल्या आहेत. मुकेश चौधरीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ४ सामन्यात ५ विकेट घेतल्या. मुकेश चौधरीच्या निवडीमागील कारण देखील त्याची वेगवान गोलंदाजी आहे. चेन्नईकडे सध्या एकही वेगवान गोलंदाज नाही आणि हा खेळाडू या संघाच्या गोलंदाजीला विविधता देतो.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पहिला सामना गमावल्यानंतर लखनऊ सुपरजायंट्सनेही त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. मोहसीन खानच्या जागी वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायला संधी मिळाली. टाय हा बदली खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये सामील झाला आहे. मार्क वुडच्या दुखापतीनंतर या खेळाडूला लखनऊ सुपरजायंट्सने विकत घेतले.

महत्त्वाच्या बातम्या-

रमेश पोवार यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदावरून होणार गच्छंती? लक्ष्मण निभावणार मोठी भूमिका

VIDEO: लखनऊसाठी ‘पर्पल कॅप’ विनरने केले पदार्पण; आजपर्यंतची कामगिरी वाखाणण्याजोगी

मुंबई इंडियन्समध्ये अखेर ‘सूर्योदय’! राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी धडाकेबाज फलंदाज संघात सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---