---Advertisement---

इराण विरुद्ध केनिया यांच्यात ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियन्सशीपचा अंतिम सामना

On: शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2019 10:36 AM
---Advertisement---

पहिल्या ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियन्सशीप २०१९-२० स्पर्धांत आज अंतिम सामना होणार आजे. १३ संघांनी यास्पर्धेत सहभाग घेतला होता. किश इस्लान्ड, इराण येथे ही होत आहे. इराण व केनिया संघांनी पहिल्या ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियन्सशीपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

उपांत्य सामन्यामध्ये केनिया संघाने पाकिस्तानचा धक्कादायक पराभव करत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. ४९-३८ अश्या फरकाने केनियाने पाकिस्तान संघावर विजय मिळवला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये यजमान इराणने बांगलादेशचा ५२-२० असा धुव्वा उडवला.

त्याआधी इराणने चिनी तैपाई संघाचा ५३-३१ असा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. पाकिस्तानने श्रीलंका संघावर ४४-३२ असा तर बांगलादेशने थायलंडवर ६२-३७ असा विजय मिळवला होता. केनियाने ७९-२४ असा डेन्मार्कचा धुव्वा उडवला होता.

अंतिम सामना:-

इराण विरुद्ध केनिया (१५ नोव्हेंबर २०१९)

वेळ: संध्याकाळी ५ वाजता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---