---Advertisement---

इराणने पटकावले पहिल्या ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियन्सशीपचे विजेतेपद

On: शनिवार, नोव्हेंबर 16, 2019 1:48 PM
---Advertisement---

पहिल्या ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियन्सशीप २०१९-२० स्पर्धात यजमान इराणने अंतिम विजेतेपद पटकावले. किश इस्लान्ड, इराण येथे पार पडलेल्या या स्पर्धेत १३ देशांनी सहभाग घेतला होता. पहिला ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियन्सशीप जिकुंन इराणने इतिहास घडवला.

अंतिम सामन्यात इराणने आफ्रिकन देश केनियचा पराभव केला. इराणने ४२-२२ असा विजय मिळवत अंतिम विजेतेपद पटकावले. त्याआधी उपांत्यसामन्यामध्ये केनिया संघाने पाकिस्तानचा ४९-३८ अश्या फरकाने पराभव केला होता. तर दुसऱ्या उपांत्यसामन्यामध्ये यजमान इराणने बांगलादेशचा ५२-२० असा धुव्वा उडवला होता.

पहिल्या वहिल्या ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशीपचे विजेतेपद जिकुंन इराण संघाने कबड्डी जगतात आपला ठसा उमटवला आहे. गेल्या काहीवर्षापासून कबड्डीमध्ये इराण चांगली प्रगती करत आहे.

पहिल्याच ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघाने सहभाग न घेतल्याने भारतीय कबड्डी रसिकांची मात्र निराशा झाली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---