आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात दीपक हुड्डा आणि संजू सॅमसनने स्वतःच्या प्रदर्शानने सर्वांवर प्रभाव टाकला. हुड्डाने या सामन्यात स्वतःचे आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिले शतक केले, तर सॅमसनने पहिले अर्धशतक केले. या दोघांमध्ये मोठी भागीदारी झाली, ज्यामुळे संघाची धावसंख्या २०० पार गेली. सॅमसनने या सामन्यात ७७ धावा केल्या, पण तरीदेखील त्याचे मन भरले नाही.
संजू सॅमसन (Sanju Samson) आणि इशान किशन सलामीसाठी आले. इशानने अवघ्या ३ धावा करून विकेट गमावली, पण सॅमसन मात्र खेळपट्टीवर टिकून राहिला. दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि सॅमसनमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी झाली, जी भारताच्या टी-२० इतिहासातील सर्वात मोठी भागीदारीही ठरली. सॅमसनने ४२ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या, तर दुसरीकडे हुड्डाने अवघ्या ५७ चेंडूत १०४ धावांची खेळी केली.
सॅमसनने जरी मोठी खेळी केली असली, तरी त्याला स्वतःचे शतक पूर्ण करता आले नाही, याची खंत वाटली. सामना संपल्यानंतर तो म्हणाला की, “हा चांगला सामना होता. आमची भागीदारी खूप चांगली होती. खेळपट्टी गोलंदाजीसाठी थोडी फायदेशीर होती, पण हुड्डाने गोष्टी माझ्यासाठी सोप्या बनवल्या. त्याने सुरुवातीपासून मोठे शॉट्स खेळले. मी त्याला स्ट्राईक दिल्यामुळे खुश होतो.”
शतक करू शकला नाही, पण तरीही आनंदी आहे सॅमसन
“नंतर मी देखील मोठे शॉट्स खेळायला सुरुवात केली. मी हुड्डासाठी खुश होतो. मी शतक करू शकत होतो. माझ्याकडे चांगली संधीही होती, पण असे होऊ शकले नाही. परंतु ज्या पद्धतीने मी फलंदाजी करू शकलो, त्यासाठी मी खुश आहे,” असे सॅमसन पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सॅमसनला संघ व्यवस्थापनाने प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले होते. पण दुसऱ्या सामन्यात त्याला संधी दिली गेली. सॅमसनने तब्बल सात वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले होतते, पण या प्रकारात सॅमसनने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिले अर्धशतक केले. यापूर्वी त्याला एकही अर्धशतक करत आले नव्हते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एवढी मोठी धावसंख्या केली, तरीही टीम इंडियाच्या नावावर नकोसा विक्रम; वाचा काय घडले
मोठी बातमी! रोहितच्या अनुपस्थितीत पाचव्या कसोटीत ‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचे नेतृत्व
बाबर चा कहर! आता तर थेट विराटचाच विक्रम केलाय स्वत:च्या नावावर