भारताचा एक संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये कसोटीसाठी सराव सामना खेळत आहे, तर दुसरा संघ आयर्लंडमध्ये पोहोचला आहे. आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारताचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेत भारताचा संघ जरी भक्कम वाटत असला तरी विरोधी संघाला कमी लेखणे चुकीचे ठरेल.
भारतीय संघ नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळला आहे. याचा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे. मात्र असे काही नसून आयर्लंडचे काही खेळाडू हा गैरसमज दूर करण्यात महत्वाची भुमिका पार पाडू शकतात. ते कोणते हे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
पॉल स्टर्लिंग हा आयर्लंडचा आक्रमक सलामीवीर आहे. टी२० प्रकारामध्ये तो खेळपट्टीवर लगेच जम बसवून मोठे शॉट्स मारतो. यामुळे भारताला याची विकेट शक्य तितकी लवकर काढणे आवश्यक आहे. ३१ वर्षाच्या या अष्टपैलू खेळाडूकडे अनुभवही तेवढाच आहे. त्याने मर्यादित षटकामध्ये आयर्लंडकडून २३७ सामने खेळले आहेत. त्याने १०२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २७७६ धावा केल्या आहेत. या प्रकारातील ११५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यानेे ९७ षटकारही मारले आहेत.
अँड्रयू बालबर्नी (Andrew Balbirnie) हा आयर्लंडचा कर्णधार असून मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज आहे. संघामध्ये २०१०ला पदार्पण करताना त्याने ६६ टी२० सामने खेळताना १४२९ धावा केल्या आहेत. स्टर्लिंग प्रमाणे याच्यातही सामना फिरवण्याची ताकद आहे.
जॉर्ज डॉकरेल हा सर्वात अनुभवी फिरकीपटू आहे. त्याने ९२ टी२० सामने खेळताना ७६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २०१०मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. बारा वर्षे टी२० क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतो.
अँडी मॅकब्रायन हा आयर्लंडचा अनुभवी गोलंदाज आहे. त्याने २६ टी२० सामन्यात २१ विकेट्स घेतल्या आहेत. तो डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने गोलंदाजी करतो. तो थोड्या प्रमाणात फलंदाजीही करू शकतो.
क्रेग यंग याने ४७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. या वेगवान गोलंदाजाने नायजेरिया विरद्ध १३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. घरच्या मैदानावर तो भारतीय फलंदाजांना चांगलाच त्रास देऊ शकतो.
भारतीय संघाचे फलंदाजी भक्कम आहे. मात्र आयर्लंडचे गोलंदाज घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवू शकतात. भारत या मालिकेतील पहिला टी२० सामना २६ जूनला डबलिन येथे खेळणार आहे. भारत विरुद्ध आयर्लंड टी२० सामन्यांचे भारतामध्ये सोनी नेटवर्कवर प्रसारण होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री ९ वाजता सुरू होणार आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे-
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
लिसेस्टरशायर विरुद्ध भारत: चालू सामन्यात ‘लॉर्ड’ ठाकूरला दिला धक्का, त्यानंतर जे झाले ते…
भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज या मालिकेतही खेळणार, वाचा संपूर्ण यादी