---Advertisement---

पहिलीच ओव्हर अन् हॅट्रिक, ‘वाह क्या बात है!’ न्यूझीलंडच्या गोलंदाजाने रचलाय विक्रम

new-zealand-Team
---Advertisement---

बुधवारी (२० जुलै) न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यातील टी-२० मालिकेचा दुसरा सामना खेळला गेला. न्यूझीलंडच्या मिचेल ब्रेसवेलने या सामन्यात इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पहिल्याच षटकात ब्रेसवेलने विकेट्सची हॅट्रिक घेतली आहे. ऑफ स्पिनर ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात ही कामगिरी केली आहे. 

सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्सच्या नुकसानावर १७९ धावा केल्या. प्रत्युत्तारत यजमान आयर्लंड संघ १३.५ षटकात ९१ धावा करून सर्वबाद झाला. परिणामी न्यूझीलंड संघाने तीन सामन्यांच्या या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. मिचेल ब्रेसवेल (Michael Bracewell) याने न्यूझीलंडसाठी टाकेलेल्या सुरुवातच्या पाच चेंडूत लागोपाठ तीन विकेट्स घेतल्या आणि मालिकेतील दुसऱ्या सामन्यात संघाला ८८ धावांनी विजय मिळवून दिला.

३१ वर्षीय मिचेल ब्रेसवेलला आंतरराष्ट्रीय टी-२० मधील त्याच्या पहिल्या सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली नव्हती. दुसऱ्या सामन्यात त्याला गोलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. ब्रेसवेल आंतरराष्ट्रीय टी-२० मधील स्वतःच्या पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीयमधील पहिले षटक टाकण्यासाठी ब्रेसवेल जेव्हा आला तेव्हा आयर्लंडची धावसंख्या ७ विकेस्टच्या नुकसानावर ८६ धावा होती. पहिल्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या बॅरी मॅगर्थीने चौकार मारला आणि नंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर मार्क एडायर डीप मिडविकेटवर ग्लेन फिलिपच्या हातात झेलबाद झाला. पुढच्या चेंडूवर मॅगर्थी देखील फिलिपच्या हातात झेलबाद झाला. आता ब्रेसवेलकडे षटकातील पाचव्या चेंडूवर हॅट्रिक घेण्याची संधी होती. पाचव्या चेंडूवर क्रेग यंगने शॉट खेळला आणि बॅकवर्ड पॉइंटवर ईश सोढीने त्याचा झेल पकडला. अशा प्रकारे ब्रेसवेलची हॅट्रिक पूर्ण झाली.

https://twitter.com/Visharad_KW22/status/1549820527073583104?s=20&t=wXIAIa-YocSIa4g4_ga4sg

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा बेसवेल न्यूझीलंड संघाचा तिसरा गोलंदाज आहे. यापूर्वी अशी कामगिरी जॅकब ओरम आणि टिम साउदी यांनी केली आहे. सामन्याचा एकंदीरत विचार केला, तर न्यूझीलंडसाठी डेन क्लीवरने नाबाद ७८ धावांचे योगदान दिले आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली.

प्रत्युत्तरात जेव्हा आयर्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला. त्यांनी सुरुवातील एकही विकेट न गमावता २३ धावा केल्या होत्या. परंतु संघाने पुढच्या २२ धावा करण्यासाठी तब्बल ५ विकेटस गमावल्या. त्यानंतर संघाची धावसंख्या झाली ५ विकेट्सच्या नुकसानावर ४५ धावा. मार्क एडायरने सर्वाधिक २७ धावांचे योगदान दिले. ब्रेसवेलव्यतिरिक्त न्यूझीलंडसाठी लेग स्पिनर ईश सोढीने ३ विकेट्स घेतल्या. तसेच जॅकब डफीनेही २ विकेट्स घेतल्या. आता उभय संघातील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना २२ जुलै रोजी खेळली जाईल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---