पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी आयर्लंडने आपला संघ घोषित केला आहे. प्रमुख फलंदाज ऍण्ड्रू बालबिर्नी चार आठवड्यांच्या या स्पर्धेत आयर्लंडचे नेतृत्व करेल. आयर्लंड संघात अनुभवी दिग्गज आणि प्रतिभावंत युवा खेळाडूंचा समावेश केला गेला आहे.
टी20 सलामीवीर पॉल स्टर्लिंग, प्रमुख अष्टपैलू जॉर्ज डॉकरेल आणि बालबर्नी 15 सदस्यीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहेत. तर, मागील काही काळापासून कमालीचा फॉर्ममध्ये असलेला युवा फलंदाज हॅरी टेक्टर आणि सातत्यपूर्ण वेगवान गोलंदाज मार्क अडायर व जोशुआ लिटल संघाला मजबुती देतील. मागील महिन्यात निवृत्ती घेतलेला अष्टपैलू केविन ओब्रायन ओब्रायन प्रथमच संघाचा भाग नसेल.
Ireland’s squad for the ICC Men’s T20 World Cup 2022 is out ☘️
Details 👇https://t.co/CI2pWn5sbq
— ICC (@ICC) September 20, 2022
आयर्लंड क्रिकेट च्या निवड समितीचे प्रमुख ऍण्ड्रू व्हाईट यांनी संघाबाबत आपली प्रतिक्रिया देताना म्हटले,
“मागील काही काळापासून आम्ही सातत्यपूर्ण कामगिरी करत आलो आहोत. अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेला मालिकाविजय आत्मविश्वास वाढवणार आहोत. अगदी तशीच कामगिरी आम्ही ऑस्ट्रेलियात करण्याचा प्रयत्न करू. काही खेळाडू दुखापतीमुळे संघाचा भाग नाहीत. त्या खेळाडूंची उणीव नक्कीच भासणार आहे. तरीही, त्यांच्या जागी तितकेच प्रतिभावंत खेळाडू आम्ही निवडलेत. आम्ही विश्वचषकासाठी पाठवलेल्या टी20 संघांपैकी हा सर्वात मजबूत संघ आहे. मी संघ आणि प्रशिक्षकांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो.”
आयर्लंडला 17 ऑक्टोबर रोजी होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे झिम्बाब्वेविरुद्ध होणार्या सलामीच्या सामन्यासह आपल्या अभियानाची सुरुवात करायची आहे.
त्यानंतर त्याच ठिकाणी ते स्कॉटलंड आणि दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजशी सामना करतील. गटातील शीर्ष दोन संघ स्पर्धेच्या सुपर 12 फेरीत पोहोचतील.
टी20 विश्वचषकासाठी आयर्लंड संघ: ऍण्ड्रू बालबिर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, फिओन हॅन्ड, जोशुआ लिटल, बॅरी मॅक्कार्थी, कोनर ऑल्फर्ट, सिमी सिंग, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, क्रेग यंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvAUS: पहिल्याच टी20 सामन्यात लागणार रेकॉर्ड्सची रांग! विराटकडे कॅप्टन रोहितला मागे टाकण्याची संधी
ठरलं एकदाचं, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाची ‘हीच’ जोडी उतरणार ओपनिंगला!