---Advertisement---

कॅम्फरच्या धमाक्याने आयर्लंडचे विश्वचषकातील आव्हान जिवंत! स्कॉटलंडविरूद्ध सर केला धावांचा डोंगर

On: बुधवार, ऑक्टोबर 19, 2022 3:52 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (19 ऑक्टोबर) पहिल्या फेरीतील दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात आयर्लंड व स्कॉटलंड या दोन युरोपियन संघांदरम्यान सामना झाला. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवलेल्या स्कॉटलंड संघाने या सामन्यात चांगली कामगिरी केली. मात्र, आयर्लंडने अष्टपैलू कर्टिस कॅम्फरच्या झंझावाती खेळीने 6 बळी गडी राखून विजय आपल्या नावे केला.

https://twitter.com/ICC/status/1582634342110601216?t=BNZGV4rvMEUXSOdpTqC66w&s=19

 

होबार्ट येथे झालेल्या या सामन्यात स्कॉटलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्कॉटलंड संघाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. तर आयर्लंडला झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागलेला. स्कॉटलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना चांगल्या भागीदाऱ्या केल्या. संघाचा सलामीवीर मायकल जोन्स याने 55 चेंडूचा सामना करताना 6 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या. मॅथ्यू क्रॉसने 28 तर बॅरिंग्टनने 37 धावांचे योगदान दिले. निर्धारित 20 षटकात स्कॉटलंड संघ 5 बाद 176 धावा करू शकला. आयर्लंडसाठी अष्टपैलू कर्टिस कॅम्फरने दोन बळी मिळवले.

स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आयर्लंड संघाला या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य होते. मात्र, अनुभवी पॉल स्टर्लिंग, कर्णधार बालबिर्नी, लॉरकन टकर व हॅरी टेक्टर चार प्रमुख फलंदाज त्यांनी 10 व्या षटकात 61 धावांमध्ये गमावले. संघ अडचणीत सापडलेला असताना अनुभवी जॉर्ज डॉकरेल व युवा अष्टपैलू कर्टिस कॅम्फरने जबाबदारी सांभाळली. खराब चेंडूंचा समाचार घेत षटकार-चौकार तर चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा घेत त्यांनी संघाला विजयाच्या दिशेने नेले. दोघांनी अखेरपर्यंत नाबाद राहत 119 धावांची विजयी भागीदारी केली. कॅम्फरने 32 चेंडूवर 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 72 तर, डॉकरेलने नाबाद 39 धावा करत संघाला 6 गडी राखून विजय मिळवून दिला. आयर्लंडला पुढील फेरीत जाण्यासाठी आपल्या अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवावा लागेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
माजी प्रशिक्षकांनी गायले मोहम्मद शमीचे गुणगाण; म्हणाले ‘शाहीन आफ्रिदीपेक्षा…’
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध न्यूझीलंड सराव सामना? एका क्लीकवर मिळवा सगळी माहिती 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---