---Advertisement---

आयर्लंडचा टी२०त इतिहास, एकाच आठवड्यात २ शतके ठोकत केला कोणालाही न जमलेला किर्तीमान

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 8:36 AM
---Advertisement---

आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात टी२० सामन्यांची मालिका खेळली जात आहेत. मालिकेतील तिसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने २ विकेट्स गमावत १७८ धावा केल्या. संघाचा सलामीवीर पॉल स्टर्लिंग याने सामन्यात दमदार खेळी करत संघाला ४० धावांनी विजय मिळवून दिला. आयर्लंडच्या संघाकडून टी२० क्रिकेटमध्ये केलेले या आठवड्यातील हे दुसरे शतक आहे. काही दिवसांपूर्वीच महिला खेळाडू गॅबी लुइसने जर्मनी विरोधात शतकी खेळी केली होती.

पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. केविन ओब्रायनसोबत संघासाठी सलामीवीराच्या भूमीकेत स्टर्लिंग मैदानात आला आणि त्याने संघासाठी शतकी खेळी केली. ४७ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने शतकासाठी लागणाऱ्या पुढच्या ५० धावा केवळ २७ चेंडूत पूर्ण केल्या. त्याने एकूण ७० चेंडूत ७ चौकार आणि ७ षटकारांसह त्याचे शतक पूर्ण केले. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार ऍंडी बरबर्नीने ३१ धावा केल्या.

आयर्लंडने रचला इतिहास
२६ ऑगस्टला आयर्लंडची महिला गोलंदाज गॅबीने जर्मनीच्या संघाविरुद्ध खेळताना टी२० क्रिकेटमध्ये शतक केले होते. त्यानंतर आता १ सप्टेंबरला (बुधवारी) स्टर्लिंगने आयर्लंडकडून टी२० मध्ये दुसरे दमदार शतक झळकावले आहे. टी२० क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा एखाद्या संघाने एकाच आठवड्याच दोनदा शतक ठोकले आहे.

सर्वाधिक टी२० शतके
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहीत शर्माने टी२० क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक चार शतक केले आहेत. टी२० प्रकारात त्याचा हा विक्रम आजपर्यंत कोणीच मोडू शकले नाही. त्यापाठोपाठ न्यूझीलँडचा केलिन मुनरो आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल यांच्या नावावर टी२० क्रिकेटमध्ये तीन-तीन शतके आहेत. त्याव्यतिरिक्त न्यूझीलँडचा मार्टिन गप्टिल, वेस्टइंडीजचा क्रिस गेल आणि इविन लुइस, ऑस्ट्रेलियाचा ऍराॅन फिंच आणि भारताचा केएल राहुलच्या नावावर दोन-दोन टी२० शतके आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: लांब केसांमुळे अक्षरश: दंड भरायला तयार होणारा इशांत शर्मा

ना ना…! कोहली आणि संघाला कमी लेखण्याची चूक करू नका; शास्त्रींची इंग्लंडला चेतावणी

भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर शास्त्री काय करणार? ऐका त्यांच्याच तोंडून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---