---Advertisement---

आयर्लंडने झिम्बाब्वेला नमवत मालिकेत साधली बरोबरी, ‘केविन ओ ब्रायन ठरला’ सामनावीर

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 1:27 AM
---Advertisement---

केविन ओ ब्रायनच्या शानदार अर्धशतकामुळे आयर्लंडने रविवारी(29 ऑगस्ट) मालिकेच्या दुसऱ्या टी -20 सामन्यात झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह आयर्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात झिम्बाब्वेने 20 षटकांत 5 गडी गमावून 152 धावा केल्या, ज्यामध्ये मिल्टन शुम्बाने नाबाद 46 धावांचे योगदान दिले. यानंतर आयर्लंडने 18.3 षटकांत 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

सामनावीर ठरलेल्या केविन ओ ब्रायनने दमदार कामगिरी करत 41 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 60 धावा केल्या. त्याने पॉल स्टर्लिंग (37) सोबत 59 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर जॉर्ज डॉकरेलने 26 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 33 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. याआधी आयर्लंडला मालिकेच्या पहिल्या टी -20 सामन्यात 3 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. मालिकेतील तिसरा टी-20 सामना 1 सप्टेंबर रोजी ब्रॅडी येथे खेळला जाईल.

डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मिल्टनने 27 चेंडूंचा सामना करत नाबाद 46 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याच्याशिवाय रायन बर्लेने 33 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 37 धावा केल्या. आयर्लंडच्या शेन गेटकेटने 20 धावांत 3 बळी घेतले.

सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि केविन यांनी आयर्लंडला दमदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 6.2 षटकांत 59 धावा जोडल्या. त्यानंतर डॉकरेलने नाबाद राहून सामना जिंकवून दिला. झिम्बाब्वेसाठी, बर्लेने 24 धावांत 2 बळी घेतले, तर तेंडाई चताराला 1 बळी मिळाला.

तत्पुर्वी, झिम्बाब्वेने रोमहर्षक अशा पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंडचा 3 धावांनी पराभव केला होता. सामन्याच्या शेवटच्या षटकात यजमान आयर्लंडला विजयासाठी 6 धावा करायच्या होत्या. पण वेगवान गोलंदाज रिचर्ड नगारवाने फक्त 2 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या. त्यामुळे झिम्बाब्वेने रोमहर्षक विजय मिळाला होता.

या विजयासह झिम्बाब्वेने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. पण दुसरी टी-20 जिंकत आयर्लंडने मालिकेत बरोबरी साधली आहे. या मालिकेकडे टी20 विश्वचषकापूर्वीची तयारी म्हणून पाहिले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

हाँगकाँगसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू आता ओडिसासाठी खेळणार रणजी ट्राॅफी

Video: अमेरिकेत उन्मुक्त चंदची बॅट तळपली; चौकार-षटकारांची बरसात करत ठोकले दुसरे अर्धशतक

रविंद्र पेहेलला लागली ७४ लाखांची बोली; ‘या’ संघाच्या ताफ्यात झाला सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---