डब्लिन | बुधवारी भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात भारताने ७६ धावांनी विजय मिळवला. भारताकडून फलंदाजीत रोहित शर्मा, शिखर धवन यांनी चमकदार कामगिरी केली.
भारताने प्रथम फलंदाजी करताना जरी २० षटकांत ५ बाद २०८ धावा केल्या तरी तुफान फटकेबाजी करणाऱ्या भारतीय फलंदाजांना रोखण्याचे काम केले ते आयर्लंडचा गोलंदाज पीटर चेसने.
त्याने या सामन्यात सुरेश रैना, एमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाद केले.
हे सर्व खेळाडू टी२०मध्ये ६००० पेक्षा जास्त धावा केलेले खेळाडू आहेत. भारताच्या ६ फलंदाजांनी टी२० मध्ये ६ हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यात कालच्या सामन्यात यातील ५ खेळाडू खेळत होते. एक शिखर धवन सोडला तर बाकी सर्व फलंदाजांना पीटर चेसने तंबूचा रस्ता दाखवला.
२४ वर्षीय पिटर चेसचा हा तिसराच टी२० सामना होता. यापुर्वी दोन सामन्यात त्याने एकही विकेट घेतली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
–२४६ वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच घडले, तेही भारतीय फलंदाजामुळे
–क्रिकेटर हरमनप्रीत कौरचे नाव इंग्लंड क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार
-पुढील १३ दिवसांत ४ संघाना टी२०मध्ये नंबर १ होण्याची संधी
–Video- कोर्टवरील हस्तमैथुनाचे हावभाव पडले महागात, टेनिसपटूला १३ लाखांचा दंड
-वनडे मालिकेत सपाटून मार खालेल्ली टीम आॅस्ट्रेलिया प्रतिष्ठेसाठी आज मैदानात