---Advertisement---

जबरदस्त! ‘या’ ३४ वर्षीय क्रिकेटरने आठव्या क्रमांकावर ठोकले नाबाद शतक, बनवला विश्वविक्रम

On: शनिवार, जुलै 17, 2021 8:20 AM
---Advertisement---

आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका नुकतीच पार पडली आहे. डब्लिन येथे शुक्रवार रोजी (१६ जुलै) उभय संघात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्याने या मालिकेचा समारोप झाला. पाहुण्या दक्षिण आफ्रिकाने ७० धावांनी हा सामना जिंकत मालिका १-१ ने बरोबरीत संपवली. दरम्यान यजमान दक्षिण आफ्रिकाचा ३४ वर्षीय गोलंदाजी अष्टपैलू सिमी सिंग याने नवा विश्वविक्रम केला आहे.

जानेमन मलानची दीडशतकी खेळी आणि क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी करताना ३४६ धावांचा डोंगर उभारला होता. अवघे ४ गडी गमावत त्यांनी ही धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात आयर्लंडचे वरच्या फळीतील फलंदाज सपशेल फ्लॉप ठरले. आघाडीचे ६ फलंदाज पव्हेलियनला परतल्यानंतर सिमी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. दक्षिण आफ्रिकेच्या अव्वल गोलंदाजांपुढे शेवटपर्यंत त्याने चिवट झुंज दिली.

सिमी सिंगने केला विश्वविक्रम
त्याने संघ सहकारी कर्टिस सॅम्परसोबत मिळून सातव्या विकेटसाठी १०४ धावांची उल्लेखनीय भागिदारी केली. सॅम्परही अर्धशतक करुन झेलबाद झाल्यानंतर सिमीने संघ सर्वबाद होईपर्यंत मोर्चा सांभाळला. ९१ चेंडूंमध्ये १४ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद १०० धावा चोपल्या. यासह तो आठव्या क्रमांकावर शतक ठोकणारा क्रिकेटविश्वातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. हा वनडे क्रिकेटमध्ये एक विश्वविक्रम आहे.

सिमीपुर्वी दक्षिण आफ्रिकाचा ख्रिस वोक्स आणि इंग्लंडचा सॅम करन यांनी वनडे क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकावर सर्वोच्च वैयक्तिक धावा केल्या होत्या. दोघांनीही नाबाद ९५ धावा करत वनडेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता. मात्र सिमीने शतक मारत त्यांना मागे टाकले आहे.

मात्र शतकानंतरही सिमी त्याच्या आयर्लंड संघाला तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत विजय मिळवून देऊ शकला नाही. ४७.१ षटकात अवघ्या २७१ धावांवर आयर्लंडचा संघ सर्वबाद झाल्याने त्यांना ७० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या-

डी कॉक-मलान जोडीची तुफान फटकेबाजी, केली विक्रमी भागीदारी

‘तुझ्यात अजून क्रिकेट शिल्लक आहे’ दिनेश कार्तिकला ‘हिटमॅन’ने करून दिली आठवण

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंनी कसली कंबर; फ्लड लाइट्समध्ये केला जोरदार सराव, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---