---Advertisement---

‘तुझ्यात अजून क्रिकेट शिल्लक आहे’ दिनेश कार्तिकला ‘हिटमॅन’ने करून दिली आठवण

On: शनिवार, जुलै 17, 2021 2:01 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक हा सध्या इंग्लंडमध्ये आहे. अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला नसला तरी, तो आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये समालोचन करताना दिसतोय. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून त्याने समालोचनाची सुरुवात केली असली तरी, तो एक सक्रिय क्रिकेटपटू आहे. त्याने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले साध्या कपड्यातील एक छायाचित्र शेअर केले. ज्यावर भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने एक मजेदार प्रतिक्रिया दिली.

रोहितने दिली मजेदार प्रतिक्रिया
सध्या समालोचनाचा आनंद घेत असलेल्या दिनेश कार्तिकने मैदानावरून एक छायाचित्र पोस्ट केले. त्यामध्ये तो कोणत्याही संघाच्या जर्सीमध्ये नव्हेतर, साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे. या छायाचित्राला त्याने ‘जस्ट मी बीईंग मी’ असे कॅप्शन दिले.

https://www.instagram.com/p/CRRHNY1pAx9/?utm_medium=copy_link

त्यावर, भारतीय संघाचा उपकर्णधार व दिनेश कार्तिकचा सहकारी राहिलेला रोहित शर्मा याने कमेंट करताना म्हटले, ‘तुझ्या मध्ये अजून काही क्रिकेट बाकी आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतोय.’

त्याला प्रत्युत्तर देताना दिनेश कार्तिकने लिहिले, ‘होय त्यावर कधीही संशय घ्यायचा नाही.’

Screengrab: Instagram/Dinesh Karthik

आंतरराष्ट्रीय सामन्यात समालोचन करतोय कार्तिक
दिनेश कार्तिक जवळपास दीड महिन्यांपासून इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून त्याने आपल्या समालोचन कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध श्रीलंका व इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान या मालिकांमध्ये तो समालोचन करताना दिसून आला. २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘द हंड्रेड’ लीगमध्येही तो समालोचन करताना दिसून येईल. विशेष म्हणजे त्याच्या समालोचन चाहत्यांना आवडत देखील आहे.

भारतीय संघातून आहे बाहेर
दिनेश कार्तिक सध्या भारतीय संघाबाहेर आहे. ३६ वर्षीय कार्तिकने २०१९ क्रिकेट विश्वचषकापासून भारतासाठी एकही सामना खेळला नाही. मात्र, आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतो. सप्टेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामात तो पुन्हा एकदा मैदानावर उतरेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

सानियाला मिळला ‘या’ देशाचा गोल्डन व्हिसा, सुरु करणार स्वतःची अकादमी

डी कॉक-मलान जोडीची तुफान फटकेबाजी, केली विक्रमी भागीदारी

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंनी कसली कंबर; फ्लड लाइट्समध्ये केला जोरदार सराव, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---