गेल्या २-३ महिन्यांपासून कोरोना व्हायरस या महामरीमुळे भारतभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता लॉकडानडचा ५वा टप्पा चालू आहे. मात्र, या महामारीचा प्रभाव थोडाफार कमी झाल्याचे दिसत असल्याने सरकराने काही गोष्टींमध्ये सूट दिली आहे. पण, अजूनही क्रिकेटची सुरुवात झाली नसल्यामुळे खेळाडू सोशल मीडियावर आपला वेळ घालवत आहेत.
नुकतेच भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू यूसुफ पठान यांच्यात इंस्टाग्राम लाइव्ह चॅट झाले. दरम्यान कैफने फिटनेस चाचणीशी (यो-यो चाचणी) संबंधीत एक दावा केला. जो इरफान पठानला आवडला नाही. Irfan Khan Feels Unhappy On Mohammed Kaif statement About Yo Yo Test
कैफ म्हणाला की, “जर आमच्या वेळेला यो-यो चाचणी होत असती, तर लक्ष्मिपती बालाजी, युवराज सिंग आणि मी आम्ही तिघेच या चाचणीत उत्तीर्ण झालो असतो.” कैफचे हेच वक्तव्य इरफानला आवडले नाही. तो लाइव्ह चॅटदरम्यानमध्ये आला आणि म्हणाला, “कैफ मी तुझे बोलणे ऐकले आहे. जर तुम्हीच ही चाचणी पूर्ण करु शकला असतात. तर आम्ही काय करत होतो? फुटाणे विकत होतो का? जेव्हा मी तुझ्यासोबत पळत असायचो. तेव्हा तुझा स्कोर १६ आणि माझा १५.५ असायचा.”
शिवाय बोलताना तिघांनीही ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉर्नची खूप प्रशंसा केली. वॉर्न हा इतर कर्णधारांपेक्षा वेगळा असल्याचे त्यांनी म्हटले. शिवाय, यूसुफने शेन वॉर्नसोबतच्या त्याच्या आयपीएल २००८ मधील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
ट्रेंडिंग घडामोडी-
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! या दिवसापासून पाहणार विराट- रोहितला मैदानावर
मजदूरांना अन्न पुरवण्यासाठी या भारतीय गोलंदाजांने लावला घराबाहेर स्टॉल
लवकरच बाप होणाऱ्या हार्दिक पंड्याची ‘आयपीएलची बाप ड्रीम…