मुंबई | प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता इरफान खानचं बुधवारी निधन झालं आहे. Colon infection झाल्याने त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. तो ५४ वर्षाचा होता.
इरफान खानला कॅन्सर झाला होता. लंडनमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. तेथील उपचारानंतर काही दिवसांपूर्वीच तो भारतात परत आला होता.
माध्यमातील काही वृत्तानुसार, इरफान (Irrfan Khan) मंगळवारी आपल्या बाथरूममध्ये घसरून पडला होता. त्यानंतर त्याला मुंबईच्या एका रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या मते, त्याला कोलन संसर्ग झाला होता, ज्याला दुर्मिळ कर्करोगदेखील म्हणतात. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे निधन झाले.
तसं पाहिले तर, इरफानने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत खूप नाव कमावले. परंतु राजस्थानमध्ये जन्मलेल्या इरफानला लहानपणी क्रिकेटपटू बनायचे होते. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे.
एका वृत्तानुसार, इरफान लहाणपणी एक उत्कृष्ट क्रिकेटपटू (Cricketer) होता. त्याची सीके नायडू ट्रॉफीसाठी निवडदेखील झाली होती. त्याला आपल्या शेजारच्या मैदानात आणि चौगान स्टेडियममध्ये जाऊन क्रिकेट खेळायला आवडत होते. परंतु परिवाराचा पाठिंबा न मिळाल्यामुळे आणि आर्थिकदृष्या सक्षम नसल्याने त्याचे स्वप्न अर्धवट राहिले. तेव्हा त्याच्याकडे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी लागणारे ६०० रुपये देखील नसल्याने त्याचा क्रिकेटचा मार्ग बंद झाला होता.
इरफान हा अष्टपैलू खेळाडू होता. तो तेव्हा जयपुरच्या संघातील सर्वात तरुण खेळाडू होता. तेव्हा हे पैसे कुणाकडून घ्यायचे याबद्दल त्याला समजलं नाही. त्याने अखेरपर्यंत घरच्यांना याबद्दल विचारलं नव्हतं.
क्रिकेट सोडण्याच्या निर्णय नंतर इरफानला योग्य वाटला. “क्रिकेटमध्ये ११ खेळाडू पुर्ण देशातून निवडले जातात. त्यात निवड होणे कठीण होते. तसेच क्रिकेटमध्ये वयाची मर्यादा असते. अभिनयात अशी कोणतीही मर्यादा नसते, “असे इरफानने एका मुलाखतीत सांगितले होते.
आज सकाळी इरफानने अखेरचा श्वास घेतल्यानंतर त्याला क्रिकेटजगतातून श्रद्धांजली वाहण्यात आली. यामध्ये भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून इरफानला श्रद्धांजली वाहिली. सचिन इरफानचा खूप मोठा चाहता होता.
Sad to hear the news of #IrrfanKhan passing away. He was one of my favorites & I’ve watched almost all his films, the last one being Angrezi Medium. Acting came so effortlessly to him, he was just terrific.
May his soul Rest In Peace. 🙏🏼
Condolences to his loved ones. ☹️ pic.twitter.com/gaLHCTSbUh— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 29, 2020
सचिनबरोबरच भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेनेही आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून श्रद्धांजली वाहिली. त्याने ट्वीट केले की, “इरफानच्या निधनाबद्दल ऐकून खूप दु:ख झाले. तो एक उत्कृष्ट अभिनेता होता. जो खूप लवकर निघून गेला. त्याचे कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या दु:खात मी सामील आहे.”
Saddened to hear the passing away of #IrrfanKhan. A wonderful actor. Gone too soon. My heartfelt condolences to his family and friends.
— Anil Kumble (@anilkumble1074) April 29, 2020
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) दु:ख व्यक्त करत देवाकडे इरफानच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी प्रार्थना केली.
Saddened to hear about the passing of Irrfan Khan. What a phenomenal talent and dearly touched everyone's heart with his versatility. May god give peace to his soul 🙏
— Virat Kohli (@imVkohli) April 29, 2020
याबरोबरच भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागनेही ट्वीट करत आपली सहानुभूती व्यक्त केली.
A great actor and a great talent. Heartfelt
Condolences to his family and well – wishers #IrfanKhan— Virender Sehwag (@virendersehwag) April 29, 2020
यादरम्यान भारतीय संघाच्या इतर खेळाडूंनीही यावेळी श्रद्धांजली वाहिली आहे.
RIP #IrrfanKhan .. a true icon and Bollywood legend. We'll miss you sir. pic.twitter.com/xHKRrdTrJh
— hardik pandya (@hardikpandya7) April 29, 2020
Deeply saddened to hear about the news of a wonderful actor Irrfan Khan. May his sould rest in peace and my heartfelt condolences to his family. 🙏 #RIPIrrfanKhan
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) April 29, 2020
Rest in peace #IrfanKhan, fabulous actor. Created is own aura and fortune around the industry. May god give his family all the strength.
— Rohit Sharma (@ImRo45) April 29, 2020
Deeply saddened to hear the passing away of Irrfan Khan sir. A versatile actor par excellence. My prayers and condolences to his family. May god give them strength. Rest in peace sir. 🙏🙏 pic.twitter.com/NdzSb3qlQF
— Washington Sundar (@Sundarwashi5) April 29, 2020
Saddened to hear the passing away of #IrfanKhan. Condolences to the entire family. An actor of great caliber! You will be cherished by us until eternity. RIP. pic.twitter.com/wLTWUz8w6Z
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) April 29, 2020
Extremely saddened to hear about the demise of #IrfanKhan. He was truly an actor with immense talent & high caliber. He will be missed badly. My heartfelt condolences to the family. #ripirfankhan pic.twitter.com/kXe7FfNvuP
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) April 29, 2020
५४ वर्षीय इरफानने ‘मकबूल’, ‘लाईफ इन अ मेट्रो’, ‘द लंच बॉक्स’, ‘पीकू’, ‘तलवार’ आणि ‘हिंदी मिडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही प्रसिद्धी मिळविली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
–धोनीच्या जागी खेळणं जातंय कठीण, धोनीफॅन्समुळे सतत येतो दबाव
-क्रिकेट जगताने वाहिली इरफान खानला श्रद्धांजली
-आधी वनडेत संघातून काढले, आता या संघाने आश्विनचा करार केला रद्द