भारतीय क्रिकेट संघ सध्या आंतरराष्ट्रीय टी२० (India in T20 Cricket) मध्ये शानदार कामगिरी करत आहे. भरातीय संघाने क्रिकेटच्या या छोट्या प्रकारातील सलग १२ सामने जिंकले आहेत. नुकतीच संघाने श्रीलंकेविरुद्धची टी२० मालिका ३-० ने जिंकली. याअगोदर भारतीय संघाने न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज संघांना देखील मायदेशात तीन सामन्याच्या टी२० मालिकांमध्ये पराभुत केेले आहे. याअगोदर भारतीय संघाने तीन सामने यूएईमध्ये टी२० विश्वचषकात जिंकले होते. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ योग्य मार्गावर येत असल्याचे दिसत आहे. आता भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) भारतीय संघाच्या गोलंदाजीबाबात मोठे व्यक्तव्य केले आहे.
पठाणला वाटते की, संघ नियोजनात अजूनही एका गोष्टीची कमतरता आहे. तो म्हणाला भारतीय संघाला डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाची गरज आहे. चेतन साकरियाने जर येणाऱ्या काळात उत्तम कामगिरी केली तर भारतीय संघाची ही गरज पुर्ण होऊ शकते.
माध्यमांशी संवाद साधताना इरफान म्हणाला, “भारतीय संघात आत्ता जेवढे गोलंदाज आहेत त्यामध्ये मला आणखीन एक नाव पाहायचे आहे. ते नाव असेल डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाचे. असा एक खेळाडू जो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करु शकतो. खलील अहमद, टी नटराजन किंवा चेतन साकारिया यांपैकी हे नाव कोणाचेही असू शकते. मला माहित आहे की साकारिया सध्या पुर्णपणे तयार दिसत नाही परंतु जर त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर तो पर्याय असू शकतो. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नेहमीच बरोबर असतो.”
ज्या तीन गोलंदाजांची नावे पठाणने घेतली त्यांपैकी कोणीच मागील काही महिन्यांपासून भारतासाठी क्रिकेट खेळले नाहीत. टी नटराजनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर २०२०-२१ तिन्ही प्रकारात पदार्पण केले होते. वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्याला भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले नाही. खलील अहमदने २०१९ साली भारतासाठी एक सामना खेळला होता. तसेच चेतन साकरियाने मागच्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी२० मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला संघात निवडण्यात आले नाही.
महत्वाच्या बातम्या-
शास्त्री गुरुजींचे आधी साहाला समर्थन, आता म्हणतायेत… (mahasports.in)
आयपीएल सुरू होण्याआधीच नवख्या गुजरात टायटन्सला हादरा! करोडपती खेळाडूचा खेळण्यास नकार (mahasports.in)