भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण आणि मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने म्हटले आहे की बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यायला हवी.
बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडू किंवा बीसीसीआयशी सलंग्न असलेले खेळाडू फक्त आयपीएलमध्ये खेळतील त्यांना परदेशी लीग स्पर्धा खेळण्याची परवानगी नाही. जर भारतीय खेळाडूंना परदेशी लीग स्पर्धांमध्ये खेळायचे असल्यास त्यांनी आयपीएल तसेच बीसीसीआयच्या सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा केलेली असावी किंवा बीसीसीआयची परवानगी घेतलेली असावी.
या नियामाबद्दल रैना आणि इरफानने शनिवारी इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ चॅटवर चर्चा केली. यादरम्यान रैनाने अन्य खेळाडूंचीही नावे घेतली. यात रॉबिन उथप्पाचाही समावेश आहे. त्याचे म्हणणे होते की असे काही खेळाडू आहे जे बऱ्याच काळापासून भारतीय संघात नाही आणि बीसीसीआयने त्यांना विविध लीग खेळण्याची संधी द्यायला हवी.
रैना म्हणाला, ‘मला आशा आहे बीसीसीआय आयसीसी आणि फ्रँचायझींबरोबर काहीतरी योजना आखतील ज्यामुळे भारतीय खेळाडूंना परदेशी लीग खेळता येईल. कमीत कमी आपल्याला २ वेगवेगळ्या परदेशी लीग खेळण्याची परानगी द्यायला हवी. जर आपण परदेशी लीगच्या बाबतीत दर्जेदार क्रिकेट खेळत राहिलो तर ते आपल्यासाठी चांगले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी अशा लीग खेळून पुनरागमन केले आहे.’
तसेच इरफान पठाण म्हणाला, ‘वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी मानसिकता असते. मायकल हसीने २९ व्या वर्षी ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. एक भारतीय खेळाडू ३० व्या वर्षी पदार्पण करु शकत नाही. मला वाटते जोपर्यंत तूम्ही तंदुरुस्त आहात तोपर्यंत तूम्ही तूमच्या देशासाठी खेळण्यास उपलब्ध असले पाहिजे. मी असं सुचवेल की जे खेळाडू ३० वर्षांचे आहे आणि जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या रडारमध्ये नाही, अशा खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यायला हवी.’
https://www.instagram.com/p/B_98cQLhySs/
याव्यतिरिक्त इरफानने कोणताही संवाद न साधता त्याला भारतीय संघातून वगळण्यात आल्याने भारतीय संघाच्या निवड समीती सदस्यांवर निशाणा साधला. तसेच त्याने असेही सांगितले की जर निवड समीतीकडून संवाद साधण्यात आला तर तो आत्ताही निवृत्तीतून माघार घेऊ शकतो. इरफानने यावर्षी जानेवारीमध्ये निवृत्ती घेतली होती.
तसेच रैना गेल्या २ वर्षापासून भारतीय संघाकडून खेळलेला नाही.
ट्रेंडिंग घडामोडी –
मोकळ्या स्टेडियमवर क्रिकेटचे सामने घ्यायचे का? विराट म्हणतो…
फक्त क्रिकेट नाही तर हे ५ खेळाडू दुसऱ्या खेळातही होते किंग
कोहली, सचिन व द्रविड कसोटीत पहिल्यांदा कधी झाले शुन्यावर बाद ? जाणून घ्या…