---Advertisement---

मोकळ्या स्टेडियमवर क्रिकेटचे सामने घ्यायचे का? विराट म्हणतो…

On: रविवार, मे 10, 2020 7:19 PM
---Advertisement---

सध्या कोरोना व्हायरसमुळे अवघ्या जगाला चिंतेत टाकले आहे. या व्हायरसमुळे आणि लॉकडाऊनमुळे सर्व जगतातील कामकाज ठप्प झाले आहे. यामध्ये क्रीडा जगताचाही समावेश आहे. या लॉकडाऊनमुळे आयपीएलदेखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.

त्यामुळे क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी सर्वच क्रिकेट बोर्डांनी कंबर कसली आहे. त्यासाठी ते सामन्यांचे आयोजन प्रेक्षकांविना करण्याचा पर्याय शोधत आहेत. अशामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) आपले मत स्पष्ट केले आहे. यावेळी त्याने क्रिकेट बोर्डांच्या सदस्यांचे समर्थन केले आहे.

नुकतेच विराटने म्हटले होते की, प्रेक्षकांविनादेखील सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते, परंतु प्रेक्षकांविना स्टेडिअममध्ये ती रोमांचकता आणि खेळ भावनेची कमतरताही जाणवेल.

विराटचा असा विश्वास आहे की, कोरोना व्हायरससारख्या (Corona Virus) साथीच्या आजार नष्ट झाल्यानंतरदेखील क्रिकेट स्टेडिअम रिकामे राहण्याची शक्यता आहे. परंतु यामुळे  खेळाडूंच्या उत्साहावर कोणताही परिणाम होणार नाही. या सर्वांव्यतिरिक्त विराटला असे वाटते की, प्रेक्षकांविना मैदानावर खेळण्यामध्ये त्या अद्भूत वातावरणाची कमतरता नक्कीच भासेल.

असे असले तरी सर्वच क्रिकेट बोर्ड आता या गोष्टीचा विचार करत आहेत की, प्रेक्षकांविना स्टेडिअममध्ये खेळण्यास सुरुवात केली पाहिजे. इतकेच नव्हे तर माध्यमांतील वृत्तानुसार ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक करण्यासाठी स्टेडिअमपासून प्रेक्षकांना दूर ठेवता येईल. कारण सध्या जागतिक साथीच्या रोगामुळे म्हणजेच कोरोना व्हायरसमुळे टी20 विश्वचषकाचे आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

तसेच विराटने नुकत्याच एका मुलाखतीत म्हटले होते की, “प्रेक्षकांविना सामन्याचे आयोजन होऊ शकते. कदाचित आता असंच होईल. खरं सांगायचं झालं तर मला माहित नाही की, प्रत्येक खेळाडू याकडे कशाप्रकारे पाहतो. कारण आतापर्यंत आम्हा सर्वांना हजारो-लाखो उत्साही चाहत्यांसमोर खेळण्याची सवय झाली आहे.”

याव्यतिरिक्त विराटने असेही म्हटले की, “मला हे माहित आहे की, प्रेक्षकांविनाही खेळाडू चांगल्या उत्साहात खेळतील. परंतु चाहत्यांच्या जल्लोषामुळे जो उत्साह वाढतो, त्यामुळे खेळाडूंचा ताण काही प्रमाणात कमी होतो. ती भावना प्रेक्षकांविना येणे कठीण होईल.”

“आम्ही तसंच क्रिकेट खेळू ज्याप्रकारे खेळले जाते. परंतु प्रेक्षकांविना तो आनंदी क्षण आणणे कठीण होईल,” असेही विराट पुढे म्हणाला.

ट्रेंडिंग घडामोडी-

-अख्तरचा ‘वेगाचा बादशाह’ किताब मिळू शकतो बुमराहला, कसा ते घ्या जाणून

-जगात एकच मुलाखत घ्यायची ठरलं तर मी ती धोनीची घेईल

-जेव्हा धोनी पाकिस्तानच्या ३ खेळाडूंना संघात घेऊन खेळला होता सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---