मागील वर्षी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने लंका प्रीमियर लीगचे आयोजन केले होते. लवकरच या लीगच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात होणार आहे. अनेक खेळाडू श्रीलंकेच्या या टी20 लीगमध्ये सहभागी होणार आहेत. लंका प्रीमियर लीगच्या येत्या हंगामात काही मोठी नावे देखील नोंदवली आहेत. यामध्ये भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण यांचाही समावेश आहे. या स्पर्धेच्या आयोजकांच्या मते, 11 वेगवेगळ्या देशातील क्रिकेट खेळणार्या खेळाडूंनी लंका प्रीमियर लीगमध्ये (एलपीएल) सहभागी होण्यास उत्सुकता दाखविली आहे.
छोट्या भावाच्या सल्ल्यानुसार चालतो युसुफ पठाण
युसुफ पठाण त्याचा छोटा भाऊ आणि माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणने दाखवलेल्या मार्गावर चालतो. खरे तर एलपीएलच्या शेवटच्या मोसमात इरफानने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. तो कँडी टस्कर्स फ्रँचायझीकडून खेळला होता. यावेळी इरफान प्रथमच कोणत्या परदेशी लीगमध्ये खेळला होता. आता युसूफनेही प्रथमच परदेशी क्रिकेट स्पर्धेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. युसुफ आपल्या तुफानी फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो.
युसुफ पठाणची कामगिरी
युसुफ पठाणने भारतीय संघासाठी 57 एकदिवसीय सामन्यांमध्ये 810 धावा बनविल्या होत्या. तर 33 विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच 22 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 236 धावा आणि 13 विकेट घेतल्या होत्या. युसुफने आयपीएलमध्ये 174 सामनामध्ये 3204 धावा बनविल्या होत्या. त्याचबरोबर 42 विकेट घेतल्या होत्या. याखेरीज तो 2011 सालच्या विश्वविजेत्या भारतीय संघाचाही सदस्य राहिला आहे.
या खेळाडूंनी आपले नाव नोंदविले
न्यूझीलंडचा मिचेल मैक्लेनाघन, जिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलर, अमेरिकेचा अली खान आणि नेपालचा संदीप लामिछाने देखील एलपीएलच्या दुसऱ्या हंगामासाठी आपले नाव नोंदविले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू जेम्स फॉल्कनरने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान सुपर लीगमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले, ज्यामुळे त्याला जास्त महत्त्व मिळत आहे. फॉल्कनर व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा, बेन डंक, कैलम फर्ग्यूसन, जेम्स फॉकनर आणि बेन कटिंग यांनाही एलपीएल फ्रँचयाझींशी करार होण्याची आशा आहे. त्याचबरोबर बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि तमीम इक्बाल देखील एलपीएल खेळण्याची इच्छा दाखविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीसाठी मीच काय कोणीही बंदुकीची गोळी खाईल; पाहा कोणी केलीय ‘कॅप्टनकूल’ची एवढी स्तुती
‘कोणीतरी याला स्माइल करायला सांगा’; रोहितच्या गंभीर लूकला बघून पत्नी रितीकाचा प्रेमळ सल्ला