---Advertisement---

‘कोणीतरी याला स्माइल करायला सांगा’; रोहितच्या गंभीर लूकला बघून पत्नी रितीकाचा प्रेमळ सल्ला

On: शनिवार, जुलै 3, 2021 12:50 PM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. परंतु या अगोदर भारतीय संघाला तीन आठवड्यांची सुट्टी दिली गेली आहे. भारतीय संघ सध्या आपल्या परिवारासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. यादरम्यान भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सजदेहच्या सल्ल्यामुळे चर्चेत आला आहे. रितिका सजदेहने इंस्टाग्राम स्टोरीवर रोहित शर्मासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

भारतीय संघ इंग्लंडमध्ये परिवारासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याच दरम्यानचा पती रोहितचा एक फोटो रितिकाने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. स्टोरीमध्ये दिसत आहे की, रितीकाने रोहितसोबत सेल्फी काढली आहे, ज्यामध्ये रोहित काळ्या चष्मामध्ये गंभीर लूकमध्ये दिसत आहे. तर रितिका स्वत: हसताना दिसत आहे.

रोहितच्या या गंभीर लूकला पाहून रितीकाने एक मजेशीर कॅप्शन लिहिले आहे. ‘कोणीतरी याला हसायला सांगा. हसलेले चांगले असते,’ असे तिने लिहिले आहे.

मुलींसोबत जबरदस्त कॅप्शनसह फोटो इंस्टाग्रामवर केला पोस्ट
काही दिवसांपूर्वीच रोहितने इंस्टाग्रामवर आपल्या आणि अजिंक्य रहाणेच्या मुलीचा फोटोही अपलोड केला होता. रोहित त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत युनायटेड किंगडमच्या लॉस्ट किंगडम पार्कमध्ये गेला होता.

रोहितने समायरासोबत झोक्यावर बसलेला एक फोटो काढला होता, ज्याला त्याने जबरदस्त कॅप्शन दिले होते. त्याने लिहिले होते की, ‘जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर ते तुम्हाला एक लहान मुल शिकवू शकेल. या दोन्ही मुलींसोबत खूप मज्जा येते.’ रोहित शर्माने पोस्ट केलेला फोटो मध्ये अजिंक्य रहाणेची मुलगी आर्या देखील दिसून येत आहे.

https://www.instagram.com/p/CQlvZbbBBk5/?utm_source=ig_web_button_share_sheet

जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना हरल्यानंतर रोहितसह सर्वच खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी आणि खुश राहण्यासाठी आपल्या कुटुंबियासोबत मज्जा मस्ती करताना दिसून येत आहेत. यामुळेच रोहितने कॅप्शनमध्ये खुश राहण्यासाठीचा हा एक रामबाण उपाय असल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीसाठी मीच काय कोणीही बंदुकीची गोळी खाईल; पाहा कोणी केलीय ‘कॅप्टनकूल’ची एवढी स्तुती

पुजाराचे इग्लंडविरुद्ध कसोटीत बाकावर बसणे निश्चित? दिग्गजाने सुचवला त्याचा उत्तम ‘पर्याय’

भारताचा ‘हुकुमी एक्का’ इंग्लंडविरुद्ध खेळण्याची शक्यता, दुखापतीविषयी अपडेट आली पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---