---Advertisement---

इरफान पठाणला व्हायचंय दहशतवादी हफिज सईद, पहा कोण म्हणतंय हे

On: शुक्रवार, जुलै 3, 2020 12:23 PM
---Advertisement---

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण नेहमीच विविध विषयांवर आपली मते स्पष्ट करताना आजकाल दिसत असतो. यामुळे अनेकदा चाहते त्याच्या या मतांवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत असतात. पण अशाच एका कमेंटवर इरफानने गुरुवारी निराशा व्यक्त केली आहे.

एका ट्विटर युजरने इरफानसाठी कमेंट केली होती की त्याला आता दहशतवादी हाफिज सईद बनायचे आहे, असे वाटत आहे.

झाले असे की इरफानने नुकतेच भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेलबद्दल भाष्य करताना म्हटले होते की त्याची कारकिर्द संपवण्यासाठी ग्रेग चॅपल यांचा हात होता असे बऱ्याचवेळा म्हटले गेले, पण हे चुकीचे आहे. इरफानच्या या भाष्याची बातमी एका चॅनेलने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली होती. त्यावर एका ट्विटर यूझरने कमेंट केली की ‘पुढचा हाफिज सईद होण्याची इच्छा इरफान पठाण लपवू शकला नाही, हे खूप तिरस्करणीय आहे.’

या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर करत निराश झालेल्या इरफानने ट्विट केले की ‘ही काही लोकांची मानसिकता आहे. आपण कुठे पोहचलो आहोत. लाजीरवाणे आणि वाईट.’

इरफानने जाहीरपणे त्याची नाराजी व्यक्त केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला लोकांच्या वाईट कमेंटकडे लक्ष न देता आपले काम करत राहण्याचा सल्ला दिला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

७व्या वर्षी घेतली धोनीकडून प्रेरणा, आज आहे दिग्गज क्रिकेटर व विद्यार्थी क्रीडा संघटनेच्या अध्यक्ष

आयपीएल २०२१ मध्ये ‘या’ संघासाठी खेळण्यास श्रीसंत उत्सुक

पाकिस्तानच्या खेळाडूंनी रंग दाखवलेच! इंग्लंडला पोहोचताच केली ‘या’ नियमांची पायमल्ली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---