---Advertisement---

मिचेल स्टार्कच्या खराब कामगिरीवर भडकला इरफान पठाण; म्हणाला, “सर्वात महाग खेळाडू…”

---Advertisement---

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनं आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कच्या खराब कामगिरीवर टीका केली आहे. मंगळवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मिचेल स्टार्क एकही विकेट घेऊ शकला नाही. शिवाय गोलंदाजीत तो चांगलाच महागात पडला.

कोलकाता नाईट रायडर्सनं ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला आयपीएल 2024 मिनी लिलावात तब्बल 24 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. मिचेल स्टार्क 9 वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतला आहे. मंगळवारी झालेल्या रोमहर्षक लढतीत राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा दोन गडी राखून पराभव केला.

एकवेळ अशी होती, जेव्हा केकेआर हा सामना सहज जिंकण्याच्या स्थितीत होता, परंतु संघाच्या गोलंदाजांनी जोस बटलरपुढे नांगी टाकली. यात स्टार्कचाही समावेश होता. मिचेल स्टार्कनं राजस्थानविरुद्ध 4 षटकात 50 धावा दिल्या. या दरम्यान त्याला एकही बळी मिळाला नाही. स्टार्कनं आपल्या स्पेलमध्ये 9 वाईड बॉल टाकले.

इरफान पठाणनं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, “संघातील सर्वात महागडा खेळाडू तुमचा कमकुवत दुवा असू शकत नाही.” मिचेल स्टार्कनं या सामन्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्यानं लखनऊविरुद्ध 4 षटकात 28 धावा देत तीन बळी घेतले होते. विशेष म्हणजे, हंगामाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्टार्कला एकही बळी मिळाला नव्हता. तेव्हाही त्याच्यावर टीका करण्यात आली होती.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध स्टार्कनं पहिल्या षटकात 11 आणि दुसऱ्या षटकात 13 धावा दिल्या. ही दोन्ही षटके त्यानं पॉवरप्लेमध्ये टाकली होती. यानंतर त्यानं दहाव्या षटकात आठ धावा दिल्या. त्यानं डावाच्या 18व्या षटकात 18 धावा दिल्या, ज्यामुळे राजस्थानला शेवटच्या दोन षटकात 28 धावाच काढायच्या होत्या. अखेरच्या 2 षटकात हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांना 28 धावा डिफेंड करता आल्या नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

आधी राजस्थानविरुद्ध पराभव अन् आता लाखोंचा दंड, श्रेयस अय्यरला बसला दुहेरी झटका!

ट्रेंट बोल्टच्या एका यॉर्करनं लाखोंचं नुकसान! कोलकाताविरुद्धच्या सामन्यात असं काय घडलं?

आयपीएलचे सर्वच्या सर्व 17 हंगाम खेळणारे 7 खेळाडू माहितीयेत का? पाहा यादी, ‘या’ तिघांसाठी यंदाची IPL असेल शेवटची

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---