---Advertisement---

इरफान पठाणला बडोदा रणजी संघातूनही वगळले !

---Advertisement---

बडोदा । भारतीय संघाचा एकवेळचा स्टार अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणला बडोदा रणजी संघातून वगळण्यात आले आहे. या संपूर्ण मोसमासाठी या खेळाडूला बडोदा संघाचे कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले होते.

इरफान पठाण गेली ५वर्ष भारतीय संघाच्या बाहेर असून २०१७च्या आयपीएल लिलावातही या खेळाडूला कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. परंतु घरच्या रणजी संघातूनही वगळणे ही नक्कीच मोठी गोष्ट आहे.

” हे खूप वाईट आहे. खूप दुर्दैवी. मला काहीही म्हणायचं नाही. माझा आता बडोदा क्रिकेट असोशिएशनशी संबंध नाही. परंतु इरफानला वगळणे हे खूप चुकीचे आहे. ” असे माजी खेळाडू किरण मोरे म्हणाले.

इरफाननेही याबद्दल ट्विटरवर लिहिले असून आपण चांगले काम करत राहणार असल्याचे म्हटले आहे.

एका ट्विटला उत्तर देताना इरफान म्हणतो, ” लोक याची स्टोरी करतील. चर्चा करतील. परंतु काहीही होणार नाही. परत आहे ते सुरूच राहील. ”

इरफान पठाणच्या जागी दीपक हुड्डा या खेळाडूकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment