कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. असेच सध्या चेन्नईमधील एक चांभार देखील संकटात सापडला आहे. आर भास्करन नाव असलेला हा चांभार सर्वाधिक कमाई आयपीएल दरम्यान करतो. पण सध्या आयपीएलचा 13 वा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला असल्याने त्यांना रोजीरोटीसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशावेळी भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण त्यांच्या मदतीला धावून आला आहे.
भास्करन यांच्याबद्दल इसपीएनच्या डिजीटल मॅक्झिनमध्ये दिलेला रिपोर्ट वाचल्यानंतर इरफानने त्यांना मदत केली आहे. इरफानने इएसपीएनच्या रोनक कपूर यांना संपर्क साधत भास्करन यांच्याबद्दल विचारणा केली होती. पुढे कपूर इरफानला रिप्लाय द्यायला विसरले. पण तोपर्यंत इरफानची मदत भास्करन यांच्यापर्यंत पोहचली होती.
With very little about humanity & acts of kindness to cheer you up these days, @IrfanPathan redeems some hope. pic.twitter.com/0PyPKtmhjC
— Raunak Kapoor (@RaunakRK) June 15, 2020
भास्करन 1993 पासून चेन्नईमध्ये झालेल्या जवळजवळ सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांचे साक्षीदार राहिले आहेत. तसेच मागील 12 वर्षांपासून ते चेन्नई सुपर किंग्स संघाचे अधिकृत चांभार आहेत.
सामन्यांच्या वेळी भास्करन खेळाडूंच्या आणि सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्राबाहेर एका छोट्या खोलीत बसतात. तर इतरवेळी चिदंबरम स्टेडियम बाहेर वल्लाजाह रोडच्या फुटपाथवर बसून ते काम करतात. पण सध्या कोणतेच क्रिकेट सामने होत नसल्याने त्यांना 2 महिन्यांपासून संघर्ष करावा लागत आहे.
त्यामुळे जेव्हा इरफानला याबद्दल कळाले तेव्हा त्याने 25 हजार रुपयांची मदत भास्करन यांना केली आहे.
याबद्दल न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भास्करन यांनी सांगितले की ‘मागील आठवड्यात इरफान पठाण यांनी काही पैसे (25,000 रुपये) पाठविले. मी कुटुंबासाठी किराणा सामान विकत घेतला. कोणतेही काम नसल्याने मी पैसे उधार घेतले होते आणि मला ते परत द्यावे लागतील. मी कसे जगेल हे मला माहित नाही. जर क्रिकेट लवकरच परत आले नसेल तर मी संपून जाईन.’
इरफानने याआधीही अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. त्याने आणि युसुफ पठाणने मास्कही वाटले होते.
इएसपीएनच्या रिपोर्टनुसार भास्करन यांना आयपीएलदरम्यान तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून एका दिवसाच्या कामाचे 1000 रुपये मिळतात. याव्यतिरिक्त खेळाडू आणि अधिकारी देखील त्यांना वेगळे पैसे देतात. ज्यावेळी सामने नसतात त्यावेळी ते 300-500 रुपये कमाई करतात.
भास्करन यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचेही पॅड नीट केले आहेत. भास्करन म्हणाले, ‘त्याचे (सचिन) पॅड अगदी वेगळे होते. ते आजच्या सिंथेटिक पॅड्ससारखे नव्हते. जेव्हा मी त्याचे पॅड नीट केले तेव्हा त्याने माझ्या कुटुंबासाठी आयपीएल तिकिटे दिली. नंतर भेटही घेतली.’
तसेच धोनीच्या भेटीबद्दल भास्करन यांनी म्हटले होते की ‘धोनीला 2005 ला चॅपॉकला आला तेव्हा मी पाहिले होते. नंतर त्याने माझ्याबरोबर चहा देखील प्याला होता. तो मला त्याच्याशी तमिळमध्ये बोलण्यास सांगत असतो. तो स्वत: देखील ही भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो. तो मला ‘माची’ म्हणतो, म्हणजे भाऊ. आम्ही मित्रांसारखे बोलतो. ‘
इरफानचे दिनेश कार्तिकनेही केले कौतुक –
इरफानने दाखवलेल्या दिलदारपणाबद्दल भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने कौतुक केले आहे. त्याने इरफान छान काम केलेस, असे म्हटले आहे.
Special stuff @IrfanPathan . Well done and to many more such small deeds of generosity from everyone. Sweet of you @RaunakRK to bring up to light such positive stuff as well during these grim times https://t.co/YFq1KJliIL
— DK (@DineshKarthik) June 15, 2020
दिनेशबरोबरच अनेकांनी इरफानचे कौतुक केले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
‘विराट म्हणायचा; ‘ती’ अजूनही माझी गर्लफ्रेंड आहे, तर ‘ती’ म्हणायची; की विराट तर माझा एक्स बॉयफ्रेंड
रणजी ट्रॉफीतला ‘बॉस’च म्हणतो, ‘या’ ३ महत्त्वाच्या स्पर्धा पहिल्या रद्द करा
‘तोपर्यंत भारत विश्वविजेता म्हणून ओळखला जाणार नाही’