---Advertisement---

Safa Baig’s Face । इरफान पठाणमे पूर्ण केली चाहत्यांची इच्छा, खास दिवशी पहिल्यांदाच दाखवला पत्नीचा चेहरा

On: सोमवार, फेब्रुवारी 5, 2024 1:43 PM
Irfan Pathan Safa Baig
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने पत्नी सफा बेग हिच्यासोबत लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा केला. रविवारी त्यांच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली. इरफानने सफासोबत लग्न केल्यापासून आतापर्यंत अनेकदा दोघांचे एकत्र फोटो पोस्ट केले आहेत. पण यापैकी एकाही पोस्टमध्ये सफाचा चेहरा चाहत्यांना पाहायला मिळाला नव्हता. रविवारी पहिल्यांदा चाहत्यांना सफा बेगचा चेहरा दिसला.

लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त माजी वेगवान गोलंदाजाने खास पोस्ट शेअर केली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “एक आत्मा अनेक भूमिका पार पाडते. मूड बुस्टर, कॉमेडियन, समस्या निर्माण करणारी, सतत साथ देणारी, मैत्रीण आणि माझ्या मुलांची आई. या सुंदर प्रवासात मी तुला पत्नी म्हणून जपतोय. लग्नाच्या आठव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

दरम्यान, ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा इरफानची पत्नी सफा बेगचा चेहला चाहत्यांना पाहायला मिळाला. याआधी तिचे अनेक फोटो वेगवान गोलंदाजाच्या सोशल मीडिया खात्यावरून समोर आले. पण यापैकी एकाही पोस्टमध्ये सफाचा चेहरा दिसत नाहीये. प्रत्येक फोटोत सफाचा चेहरा बांधलेला किंवा इरफानच्या मागे लवलेला होता. पण रविवारी अखेर चाहत्यांना इरफानची पत्नी कशी दिसते, हे समजले. चाहत्यांकडून इरफानने रविवारी शेअर केलेल्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official) 

इरफान भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू असून सध्या तो समालोचकीच्या भूमिकत दिसतो. इरफानच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने कारकिर्दीत 29 कसोटी, 120 वनडे आणि 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. फलंदाजाच्या रुपात त्याने 1105 कसोटी, 1544 वनडे आणि 172 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजाच्या रुपात 100 कसोटी, 173 वनडे आणि 28 विकेट्स टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतल्या. (Irfan Pathan made wife Safa Baig’s face public for the first time)

महत्वाच्या बातम्या – 
न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडविरुद्ध अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज, मोठा विक्रम केला नावावर
IND vs ENG कसोटीचा टर्निंग पॉइंट, कर्णधार रोहितचा स्लिप्समध्ये नेत्रदीपक झेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---