इरफान पठाणचा जलवा आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला इरफान आता लंका प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. तो कॅंडी टस्कर्स या संघाकडून खेळणार आहे. त्यासाठी तो आपल्या कुटूंबासह श्रीलंकेला पोहोचला आहे.
श्रीलंकेत गेल्याचा फोटो सोशल मीडियावरही इरफानने शेअर केला आहे, ज्यात तो आपल्या मुलासह उभा असलेला दिसत आहे. इरफानने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्स करण्यात येत असून त्याला या स्पर्धेसाठी त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
इरफान ज्या कॅंडी टस्कर्स संघाकडून खेळणार आहे, त्या संघाचा मालक बॉलिवूड अभिनेता व निर्माता सोहेल खान हा असून त्यानेच संघात इरफानची निवड केली आहे.
In Srilanka for the #LPLT20 looking forward to this new journey… #cricket pic.twitter.com/fuzcRqyedz
— Irfan Pathan (@IrfanPathan) November 16, 2020
लंका प्रीमियर लीगची सुरुवात 21 नोव्हेंबरपासून होणार आहे. ही स्पर्धा 13 डिसेंबरपर्यंत खेळली जाईल. पलेकल आंतरराष्ट्रीय स्टेडियम व महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सर्व सामने खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत 15 दिवसांत एकूण 23 सामने खेळले जातील.
यावर्षी इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. निवृत्तीनंतर इरफान अखेरचा ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2020’ मध्ये क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसला होता. त्या स्पर्धेत इरफानने फलंदाजी व गोलंदाजीने शानदार प्रदर्शन केले होते. पण कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाली.
लंका प्रीमियर लीगबाबत श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी म्हटले आहे की या स्पर्धेमुळे श्रीलंका क्रिकेटला मदत होईल. लंका प्रीमियर लीग श्रीलंकेतील युवा खेळाडूंच्या विकासास गती देण्यास मदत करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
हिंदू देवतेची पूजा केली म्हणून बांगलादेशी क्रिकेटपटूला आली जीवे मारण्याची धमकी
विराटऐवजी दुसरा कर्णधार असता तर बेंगलोरने विजेतेपद मिळवले असते का? दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न
ग्रेट कार्ड्स! केएल राहुलने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर अथिया शेट्टीने दिली प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख –
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…